Saturday, July 8, 2023

विनापरवाना गावठी कट्टा बाळगणार्‍या एकास पकडले.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरात बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या एकास त्याच्या राहत्या घरासमोरून शुक्रवारी (दि.7) पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        चरणसिंग मंगलसिंग बावरी ( वय 42 रा. आंबेडकर नगर. परळी) असे आरोपीचे नाव आहे. हा व्यक्ती विनापरवाना गावठी कट्टा काढतुसासह बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. होती. त्यानुसार सापळा रचला. आरोपीला त्याच्या घरासमोरून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा, जिवंत काडतुस आढळून आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक हाईटवार, पोलीस नाईक सचिन सानप, डाके, शिंदे, मनोज घुगे, डोंगरे आदींनी केली आहे. याप्रकरणी पो.कॉ.मनोज घुगे यांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार भताने हे करत आहेत.

No comments:

Post a Comment