Sunday, July 30, 2023

पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला. तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू .


आष्टी (प्रतिनिधी) - घरासमोर असलेल्या विद्युत खांबाच्या ताणाला अचानक विद्युत प्रवाह उतरला. जनावरांना चारा पाणी करणाऱ्या शेतकऱ्याचा स्पर्श खांबाला झाल्याने विजेच्या धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. शशिकांत सुभाष परकाळे (२४) असे शेतकर्‍याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील शशिकांत परकाळे (२४) आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घरासमोर बांधलेल्या जनावरांना चारापाणी देण्याचे काम करत होता. दरम्यान, तेथे असलेल्या विद्युत पोलच्या ताणाला शशिकांतचा स्पर्श झाला. या पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शशिकांतच जागीच मृत्यू झाला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात  शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याच्या पाश्यात आई,वडिल, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. 

एकुलता एक मुलगा हिरावला.

सुभाष परकाळे यांना शशिकांत हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे दुर्दैवी निधन झाल्याने एकुलता एक मुलगा हिरावला गेल्याने कुटुंब दुखात बुडाले आहे.

No comments:

Post a Comment