Tuesday, July 18, 2023

वीज पडून गाय दगावली; शेतकऱ्याचे जवळपास १ लाखाचे नुकसान.

बीड (प्रतिनिधी): शेतकऱ्याच्या जोडधंद्यावर अस्मानी विरजण पडलंय. बीडच्या चिंचपूर येथे वीज पडून गाय दगावल्याने शेतकऱ्याचा जोड व्यवसाय बंद झाला असून जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 
संभाजी बन्सी सातपुते असं नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी संभाजी सातपुते यांनी शेतीला जोडधंदा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल यासाठी गाय घेतली होती. गाय २२ लिटर दुध देत होती. त्यामुळे सातपुते यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागायचा. परंतु, या जोडधंद्यावर अस्मानी विरजण पडले आहे.

वीज पडल्‍याने नुकसान

बीड जिल्‍ह्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. याच दरम्‍यान वीज पडून गायीचा मृत्‍यू झाला आहे. यामुळे त्यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी संभाजी सातपुते यांनी केली.

No comments:

Post a Comment