Thursday, July 6, 2023

वीज पडून 2 बैलचा मृत्यू शेतकर्‍यांला तात्काळ आर्थिक मदत देण्याची अभिजित कुडे यांची मागणी.


वरोरा (प्रतिनिधी) - तालुक्यातील  उखर्डा  येथील शेतकरी रमेश कुडे यांच्या शेतात वीज  पडून त्यांच्या 2 बैल जागीच ठार झाले  . शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे व यावेळी बैल नसेल तर, शेतकर्‍यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो त्यात बैल मरण पावले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अभिजित कुडे यांनी केली. आधीच मदत तोकड्या स्वरुपात मिळत असून खूप वेळ लागतो त्यामुळे शेतीच्या कामाला बैल नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.  ही घटना सायंकाळी 7 चे सुमारास घडली, शेताच्या बाजूच्या शेतकरी ने माहिती दिली त्यानंतर पटवारी मेश्राम यांनी पंचनामा केला आहे.  दीड लाख रुपयांची बैल मृत्यूमुखी  पडल्याने शेतकर्‍याला मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.  शेतीची कामे पूर्ण कसे करणार त्यासाठी नवीन बैलजोडी घ्यावी लागेल पण आधी च शेतकरी कर्जबाजारी असतो कसाबसा शेती लागवड करतो त्याला बैल घेणे आवश्यक आहे त्यामुळे ही मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी अभिजित कुडे  यांनी केली आहे

No comments:

Post a Comment