Thursday, June 1, 2023

हॉटेल मालकाने हॉटेलमधील केबीनमध्ये पडद्याने गळफास घेऊन केली आत्महत्या.


केज (प्रतिनिधी) :- केज येथील हॉटेल चालकाने हॉटेलातील केबीनमध्ये पडद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

या बाबतची माहिती अशी की, गुरुवार दि.१ जून रोजी केज-बीड रोडवरील उमरी पाटी जवळ असलेल्या गंगामाऊली साखर कारखान्या जवळ नितीन शिवाजी खाडे वय ४५ वर्ष यांचे हॉटेल शिवशाही नावाचे हॉटेल आहे. दि. १ जून रोजी हॉटेल बंद होते. सायंकाळी ६:०० वा. च्या पूर्वी नितीन शिवाजी खाडे याने हॉटेलच्या केबीन मध्ये असलेल्या लोखंडी बारला केबीनच्या दोन पडदे एकमेकांना गाठ मारून त्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच केज पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचासमक्ष प्रेताची पहाणी करून पुढील तपासणी व शविच्छेदनासाठी प्रेत उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.

दरम्यान मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नितीन शहाजी खाडे यांंच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे , तर नितीन खडे यांच्या मृत्यूमुळे त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे

No comments:

Post a Comment