या शौचालयाच्या बाजूला भाजीपाला व्यापारी आपली दुकान थाटून बसतात. दिवसभर भाजीपाला विकला जातो आणि रात्री दहा साडेदहा नंतर उरलेला भाजीपाला बाजूलाच असणाऱ्या नगरपालिकेच्या महिला शौचालयामध्ये ठेवण्यात येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच भाजीपाला आपल्या भाजीपाल्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात येतो.
नगरपालिकेने हे शौचालय महिलांसाठी बांधलं आहे. मात्र या शौचालयाचा रात्रीच्या वेळी हा भाजीपाला विक्रेता जणूकाही कोल्ड स्टोरेज म्हणून या वापर करतोय की काय ? असं वाटू लागलं आहे.
विशेष म्हणजे स्वच्छ बीड सुंदर बीड असा नारा बीड नगरपालिका देत आहे. मात्र याच नगरपालिकेने महिलांसाठी बांधलेल्या शौचालयात भाजीपाला विक्रेता आपला भाजीपाला ठेवतोय. आणि तोच भाजीपाला बीडकरांना विकून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, या घटनेने बीड शहरात एकच खळबळ उडाली असून बीडकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नगरपालिका आणि अन्न औषध प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment