केज(प्रतिनिधी) तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानची दिंडी देहू ते पंढरपूर या आषाढी वारीसाठी मागच्या अनेक वर्षांपासून निघते. संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील दिंडी शेकडो वारकऱ्यांना बरोबर घेऊन तुकोबा-ज्ञानोबा, विठोबाच्या नावाचा गजर करत उत्साहाने देहूकडे प्रस्थान करते.प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी पावनधाम दिंडी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये दाखल झाली. मागच्या तीन ते चार वर्षांपासून वेळेवर पडणारा पाऊस वेळेवर न पडल्याने उन्हाची तीव्रता अधिक राहिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आपण बरोबर आणलेल्या वारकर्यांना उन्हाचा त्रास होवूनये त्याचबरोबर विश्रांती आणि भोजन आनंदाने करता यावे या हेतूने अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे विभागीय अध्यक्ष तथा संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे यांनी
देहू ते पंढरपूर पर्यंत शामिना मंडपाची व्यवस्था केली. संपूर्ण सोहळ्यात संत तुकाराम महाराज पावनधामची एकमेव दिंडी अशी आहे की ज्यांनी वारकऱ्यांना सावलीची व्यवस्था केली आहे. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी निवार्याच्या व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment