पाटोदा (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीडमध्ये खुनाचे सत्र सुरूचं आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी परळी शहरात भर रस्त्यावर एकाचा मारहाण करत खून करण्यात आला होता.
ही घटना ताजी असतानाच शेताच्या बांधावरून का गेला म्हणत बीडच्या कुसळंब गावात 36 वर्षीय शेतकऱ्याचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. गोरख अजिनाथ पवार रा. कुसळंब ता. पाटोदा जि. बीड असं खून करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील शेतकरी आरोपी संतोष पवार वय 45 व गोरख आजिनाथ पवार वय 36 यांच्यामध्ये शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान संतोष पवार यांनी गोरख पवार यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जामखेड येथे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अभिजित धाराशिवकर, एपीआय प्रताप नवघरे, पीएसआय राहुल पतंगे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी संतोष पवारला ताब्यात घेतले असून, मृत गोरख यांच्या पत्नी शोभा पवार यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment