Wednesday, June 14, 2023

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन ई.व्ही.गिरीश यांचे विशेष व्याख्यान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय परळी वैजनाथच्या वतीने शनिवार दि.17 जुन रोजी स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 6 वा. ई.व्ही.गिरीश यांचे संबंधों मे मधुरता या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.
ब्रह्माकुमारीज् शांतीभवन पंचवटीनगर, येथे शनिवार दि.17 जुन रोजी स्नेह मिलन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात मुंबई येथील प्रसिद्ध वक्ते तथा कॉर्पोरेट ट्रेनर ई.व्ही.गिरीश यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. आपसातील संबंध, नाते संबंध आणि त्यातून निर्माण होणारी मधूरता या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment