वसई (प्रतिनिधी) १ एप्रिल २०२३ दिवशी आगाशी विभाग (आगाशी, चाळपेठ, अर्नाळा, चाळपेठ व उंबरगोठण) मधील कार्यकर्ते तसेच आगाशी आंबेडकर नगर मधील सहा पाड्यांचे नेतृत्व करणारे माननीय श्री. प्रभाकर वागळे व त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
सदर प्रवेश मा. मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व पालघर जिल्हा संपर्क प्रमूख सूनिल भाऊ शिंदे तसेच पालघर जिल्हा प्रमूख पंकज दादा देशमूख तालूका संपर्क प्रमूख (नालासोपारा विधानसभा) महेश राऊत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते तसेच महीला कार्यकर्ते यांचा प्रवेश आगाशी येथील आंबेडकर नगर येथे पार पडला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी उपविभाग प्रमूख महेश म्हात्रे व ग्रामसदस्या अर्चना पवार यांनी केले तसेच या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून काही कार्यकर्त्यांना जिल्हा, तालूका, शहर तसेच शाखा प्रमूख व उपशाखा प्रमूख अशी पदे विविध विभागात देवून सन्मानित करण्यात आले. पदे घेवून पक्ष वाढीचे काम हे आपल्या विभागात तसेच तालूक्यात जोमाने करावे असे संपर्क प्रमूख सूनिल भाऊ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.
विविध क्षेत्रात शिबीर घेवून घरा घरात पक्ष पोहोचवां असे जिल्हाप्रमूख पंकजदादा कडून सांगण्यात आले. तर महीलांनी आघाडीवर राहून बचत गट काढून विविध माध्यमातून शिवसेना पक्ष वाढीचे काम केले पाहीजे असे जिल्हा संघटक किरण ताई चेंदवणकर यांनी त्याच्या भाषणात सांगितले
प्रमूख उपस्थिती म्हणून पालघर जिल्हा संपर्क प्रमूख सूनिल भाऊ शिंदे, पालघर जिल्हा प्रमूख पंकज दादा देशमूख, वसई संपर्क प्रमूख जगदिश कदम, तालूका संपर्क प्रमूख (नालासोपारा विधानसभा) महेश राऊत, वसई विरार शहर संघटक विनायक जी निकम, माजी नगरसेवक राजन पाटिल तसेच महीला आघाडी पालघर जिल्हा संघटक किरणताई चेंदवणकर, तालूका समन्वयक पूष्पाताई गोडविंदे असे मान्यवर वायासपिठावर होते.
जाहीर झालेली पदे पूढील प्रमाणे :-
गिरीष दिवाणजी जिल्हासहसचिव (नालासोपारा विधानसभा), अभिजीत दिलीप सांगळे तालूका समन्वयक (वसई विधानसभा), दिलीप सांगळे विभागप्रमूख आगाशी, मूमताज शेख विभागप्रमूख टेंभीपाडा, विजय लीलाधर पाटील उपविभागप्रमूख टेंभीपाडा, सचिन म्हात्रे शाखाप्रमूख आगाशी, राजेश ठाकूर उपशाखाप्रमूख आगाशी, किरण नथुराम कवळी शाखाप्रमूख चाळपेठ, मनोज जगन्नाथ पंडित उपशाखाप्रमूख चाळपेठ, हेमंत करवीर शाखाप्रमूख उंबरगोठण, सचिन हरिभाऊ राऊत उपशाखाप्रमूख उंबरगोठण, संदिप धडपे शाखाप्रमूख टक्कापाडा भाटिबंदर, सनि सोन्या कोरडे उपशाखाप्रमूख टक्कापाडा भाटिबंदर, राजेश राऊत उपशाखाप्रमूख टक्कापाडा भाटिबंदर, नरेश भोईर शाखाप्रमूख कोल्हापूर पाडा, नरेश आत्माराम भोईर उपशाखाप्रमूख कोल्हापूर पाडा, पिटर डिमोंटी उपशाखाप्रमूख कोल्हापूर पाडा, महेश तांडेल शाखाप्रमूख टेंभीपाडा, भालचंद्र मांगेला उपशाखाप्रमूख टेंभीपाडा.
No comments:
Post a Comment