तर भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना ३ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना मात्र या निवडणुकीत धक्का बसला आहे. आजबे यांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीचा नामांकन अर्ज काढून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. एकंदरीत बाजार समितीवर सुरेश धस यांची म्हणजेच भाजपची एकहाती सत्ता आली असून बाजार समितीची राज्यातली पहिलीच बिनविरोध निवडणूक आहे.
सहकार क्षेत्रातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला पाहिलं जातं. शेतकऱ्यांचा मालाची खरेदी अन् विक्री ही याच समितीच्या माध्यमातून होत असते. यामुळे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा, लोकसभा अन् जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर देखील चांगलाच परिणाम होत असल्यामुळे या निवडणुका अतिशय म्हत्वाच्या मानल्या जातात.
बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत जवळपास ६ बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर ३ ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. अशातच एक निवडणूक बिनविरोध झाल्याने आता उर्वरित निवडणूकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
No comments:
Post a Comment