बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात आज दिवसभरात अपघाताच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये एकून ३ जणांचा मृत्यू झालाय. तर २ जण गंभीर जखमी आहेत. पहिला अपघात हा मांजरसुंबा - केज राष्ट्रीय महामार्गावर सारणी सांगवी जवळ घडला आहे.
येथे ट्रॅव्हल आणि मोटरसायलचा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात मृत पावलेल्यांची नावे विकास पवार व विजय आव्हाड अशी आहेत. दोघेजण वडमाऊली दहिफळ येथे यात्रेनिमित्त आले होते. दर्शन आटोपून गावकडे जाताना हा अपघात घडला
तर दुसऱ्या अपघातात बीड -परळी महामार्गावरील दिंद्रुड जवळील सरस्वती नदीच्या पुलावर घडला आहे. भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन जवळपास 1 किलोमीटर फरपटत नेले. यात दुचाकीस्वर अशोक ठोंबरे हा जखमी झाला होता.
बीडमधील हे दोन्ही अपघात फार भीषण होते. पहिल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे बीड शहर हादरून गेलंय. प्रसवास करताना वाहतुकीचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र अनेक व्यक्ती हे नियम मोडतात. त्यामुळे त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात येतो.
No comments:
Post a Comment