चंद्रशेखर चाकूरकर हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज केला होता.
चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत. दररोज सकाळी ते फिरायला घराबाहेर पडायचे. त्यानंतर ते स्वतःच्या घरी जाण्याऐवजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी जत होते. तिथे चहा पाणी झाल्यावर तेथील पेपर वाचत बसणे ही त्याची खूप वर्षापासूनची सवय आहे. त्यानंतरच ते बाजूलाच असलेल्या स्वतःच्या घरी जात होते.
दरम्यान सकाळी फिरून आल्यावर नित्याप्रमाणे चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज चाकूरकर यांच्या घरी आले. घरात आल्यावर शैलेश पाटील यांनी त्यांना चहा घ्या मी आवरून येतो, असे सांगून निघून गेले. मात्र काहीवेळाने गोळीचा आवाज झाला. त्यामुळे घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. यावेळी त्यांना तिथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. तर घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामाची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान चंद्रशेखर चाकूरकर यांनी आधीच आत्महत्या करण्याचा निश्चीय केला असल्याचं समोर आले आहे. कारण आज सकाळी जेव्हा ते नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले, त्यानतंर त्यांनी स्वताच्या मोबाईल मधील परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सअँपवर देखील त्यांनी ‘गूड बाय’ स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
No comments:
Post a Comment