*खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, अक्षय मुंदडा, माजी आ.पृथ्वीराज साठे,काँग्रेसचे राहूल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती.
केज(प्रतिनिधी) तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेहवैकूंठ गमण सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिदेहू म्हणून प्रसिद्ध असणारे श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेहवैकूंठ गमण सोहळ्या निमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवर्य महंत श्री महादेव महाराज बोराडे शास्त्रीजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
काल्याच्या किर्तन सेवेस खासदार डाॅ.
प्रितमताई मुंडे ,अक्षय मुंदडा,माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे राहूल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, तानाजी देशमुख, विष्णू घुले,त्र्यंबक देशमुख, संकेत मोदी, ज्ञानेश्वर जाधव,जालिंदर आधटराव पंढरपूर,अरूण काळे, भागवत शिंदे, दिलीप शिंदे, सुदाम पाटील, पंडीत सावंत,प्रशांत निगडे,गणेश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महादेव महाराज बोराडे म्हणाले कि, संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पारायण वारंवार व्हायला पाहिजे. गाथेतील शिकवणीनुसार आपण आचरण ठेवले तर प्रत्येक माणसाला जगण्याचा अर्थ समजेल. महाराजांनी राजकिय, सामाजिक व पंचक्रोशीततील उपस्थित लाखो भाविकांचे शब्द सुमनाने स्वागत केले व आभार मानले.
गेली सात दिवसांपासून चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण, श्रीमद् भागवत कथा व महाराष्ट्रभरातील सुप्रसिद्ध किर्तनकारांच्या माध्यमातून भक्ती ज्ञान रसाचे ग्रहण लाखो भाविकांनी केले. सप्ताहात 24 तास अन्नदान, आरोग्य शिबिर , कृषी मार्गदर्शन व्यसनमुक्ती, युवाशक्ती प्रबोधन शिबिरे यांसारख्या उपक्रमातून अखंड हरिनाम सप्ताहास रंग चढला.
जगद्गुरु तुकोबारायांच्या दर्शनासाठी प्रति देहू पावनधाम येथे परिसरातील 40 गावाहून पायी वारीच्या माध्यमातून हजारो भाविक संस्थान वर दाखल झाले. टाळ दिंडी नामघोषाच्या या गजरात आलेल्या वारकऱ्यांमुळे पंढरपूरचे स्वरूप संस्थानवर दिसू लागले.
आलेल्या सर्व भाविकांसाठी दररोज पंचक्रोशीतील सर्व गावाहून प्रत्येक घरातून मधुकरी स्वरूपात भाकरी येत होत्या, तर दानशूर अन्नदात्यांच्या माध्यमातून इतर अन्नदान प्रसादाचे व्यवस्थापन करण्यात आले. सदेह वैकुंठ गमनाच्या दिवशी काल्याच्या निमित्ताने महाप्रसाद अन्नदान सौजन्य नामदेवरावजी गोरे यांच्या द्वारे प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल महाराज,अशोक महाराज, हनुमंत महाराज जनार्धन महाराज शाम महाराज सुशिल महाराज यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment