Monday, March 27, 2023

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा च्या वतीने महीला दिना निमित्त ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम. महिलांचा सन्मान.


जागतिक महीला दिनाच औचित्य साधून आगाशी परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची रूपरेषा प्रथम पारितोषिक सोन्याची नथ, दूसरे पारितोषिक पैठणी साडी असा होता. या महीला कार्यक्रमात आगाशी, टेंभीपाडा, कोल्हापूर, अर्नाळा व उंबरगोठण परिसरातील अनेक महीलांना या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली व विविध प्रकारचे एकूण २१ खेळ या कार्यक्रमात खेळण्यात आले व सर्व कार्यक्रमाचा खेळामार्फत महिलांनी आनंद लूटला. या कार्यक्रमात प्रमूख उपस्थिती म्हणून पालघर जिल्हा अध्यक्ष पंकज जी देशमूख, वसई तालूका प्रमूख राजाराम जी बाबर, वसई विरार शहर संघटक विनायक जी निकम, माजी नगरसेवक राजन पाटिल व महेश म्हात्रे, रेमन मिनीजिस, अभिजीत सांगळे तसेच शिवसेना पक्षातील महीला आघाडीच्या धडाडीच्या नेत्या सौ. भारती गावकर पालघर जिल्हा संपर्क संघटक, सौ. किरणताई चेंदवणकर पालघर जिल्हा संघटक, सौ. भारती गावडे उपजिल्हा संघटक, सौ. प्रभा सूर्वै तालूका संघटक शहर, सौ. अंजेला तांडेल तालूका संघटक ग्रामिण, रूचिता विश्वासराव शहरसंघटक नालासोपारा, सौ. पुष्पा घोडविंदे तालूका समन्वयक ग्रामिण असे मान्यवर लाभले.

No comments:

Post a Comment