*पुण्यातील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेला कंटनेर चार वाहनांना धडकल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात २ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)
No comments:
Post a Comment