Friday, February 10, 2023

शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाईत भररस्त्यात तरुणावर हल्ला करत खून.






अंबाजोगाई (कांतीकारी साथी न्युज) : बीडच्या अंबाजोगाई शहरातील भररस्त्यावर ३७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करत दगडाने ठेचून खून  करण्यात आला. ही थरारक घटना गुरूवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान घडली. नयूम अली चाऊस उर्फ बिल्डर असे मयत तरुणाचे नाव आहे. 
पोलिसांच्या माहितीवरून रविवार पेठ अंबाजोगाई येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या नयूम अली यास अंदाजे ५ ते ६ हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेऊन हल्लेखोरांनी फायटर, तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने नयूमवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नयूमचा जागेवर मृत्यू झाला.

हल्‍लेखोरांनी काढला पळ

घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळातून पळ काढला. दरम्यान याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेने शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment