Tuesday, February 14, 2023

परळीच्या लावण्याई पब्लिक स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने. विविध गाण्यावर सादर केले नृत्य.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील डीएसएम प्रतिष्ठान संचलित लावण्याई स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या  सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान धारण करत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोककलेचे विविध सांस्कृतिक आयाम सादर केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव  धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला, बालकल्याण व शिक्षण विभागाच्या माजी सभापती तथा मराठी नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या अध्यक्षा सौ अपर्णाताई हृषिकेश नेरलकर यांची उपस्थिती होती.
परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या डॉ डी.जे. दंडे  व्यासपीठावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर दैनिक दिव्य लोकप्रभाचे नांदेड येथील उपसंपादक    प्रा.संतोष कुलकर्णी, डाॅ  सुरेश  चौधरी,  लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाचे पदाधिकारी मंगेश संजय देशमुख, चेतन सौंदळे,डॉ. सुवर्णाताई टिंबे, डॉ वैभव डूबे, कुषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव बलवीर  रामदासी  मार्गदर्शक मधुकरराव गिरवलकर,  अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी, शाळेच्या प्राचार्या अस्मिता गोरे  यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली. स्नेहसंमेलनाचा भव्य दिव्य कार्यक्रम विद्युत रोषणाई, आधुनिक ध्वनी व्यवस्था व आकर्षक व्यासपीठाची उभारणी करून डॉ डी.जे. दंडे व्यासपीठावर घेण्यात आला.  स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्या  पुजा बिडवे, कविता विर्धे, हर्षदा  परदेशी,  संघमिञा पोटभरे,  शेख सर त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचलन  कांबळे  सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन  उपमुख्याध्यापक  पुजा बिडवे यांनी केले. अस्मिता  गोरे, पुजा बिडवे,  हर्षदा  परदेशी संघमिञा  पोटभरे,  कविता विर्धे,  शेख सर  आदिचा बेस्ट  टिचर्स म्हणुन  शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान  करण्यात  आला.

* बालमनांवर नीती मूल्ये व संस्कारांची गरज - सौ. अपर्णाताई नेरलकर.. 

सध्या मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे लहान मुलांवर परिणाम होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी विशेषतः आईंनी मोबाईलचा वापर कमीत कमी करावा. बाल्याअवस्थेत असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे व व्यक्तिमत्त्वविकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आयामांसाठी लक्ष देणे आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या जी तीव्र स्पर्धा निर्माण झालेली आहे त्यामध्ये प्रत्येक मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हायला हवा असा अट्टहास पालकांनी करू नये. मुलांच्या करिअर विषयी पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलावर लादू नये. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तणाव रहित व हसत खेळत नैतिक विचारांचे पोषण करणारे मूल्य शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढे आले पाहिजे असे विचार प्रकट केले. आपल्या जन्मभूमी मध्ये लावण्याई पब्लिक स्कूलच्या संचालकांनी स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले. परळी शहरातील वैद्यनाथ विद्यालय व कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आपल्यातील कलागुणांची जोपासना व व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्याला घडविण्यामध्ये आई वडील, गुरुजन, नातेवाईक व परळी शहरातील सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
................................................
* बाजीराव धर्माधिकारी यांनी संगणक शाळेसाठी भेट दिला. 

कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण घेता यावे व परदेशी भाषा आत्मसात करण्यासाठी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक संगणक शाळेला भेट दिला. भविष्यातही शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आपल्या भाषणामध्ये आश्वासन दिले.

.........................
* डॉ सुरेश चौधरी यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी आपले वाचन चौफेर केले पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक वारसा व पर्यावरण याविषयी माहिती घेऊन त्यावर भरीव काम केले पाहिजे असे विचार प्रकट केले.
...................
* चार्ली चॅपलीन ठरला आकर्षणाचा बिंदू
छत्रपती संभाजी नगरहुन आलेले सुमित पंडित यांनी आकर्षक हावभाव व भावमुद्रा साकारत जगविख्यात चार्ली चापलीनची वेशभूषा सादर करून बाळ गोपाळांचे मनोरंजन केले. हुबेहूब भावमुद्रा व वेगवेगळ्या ॲक्शन करून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

No comments:

Post a Comment