मुंबई (प्रतिनिधी) : बारावीची परीक्षा सुरू झाल्या पासून परीक्षा बोर्डच्या अनेक त्रुटी पुढे येताना दिसत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या मनोबळावर परिणाम होताना दिसत आहे. मात्र आता बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
इंग्रजीच्या पेपरमध्ये चूक आढळल्यावर आता त्या चुकीच्या प्रश्नाला सरसकट 6 मार्क देण्यात येणार आहेत. इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी पर्यवेक्षकांना दिलेल्य़ा सूचना छापल्या होत्या. चूक बोर्डाच्या लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. इंग्रजी पेपरमधील पान नंबर १०वर हा प्रकार पाहायला मिळाला. तीन प्रश्नांमध्ये पर्यवेक्षकांसाठीच्या सूचना छापल्या होत्या. प्रत्येकी 2 गुणांचे हे तीन प्रश्न होते. नक्की काय करायचं हे लक्षात न आल्याने बहुतेक विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवलाच नाही. अखेर बोर्डाने या प्रश्नाचे 6 गुण बहाल करण्याचा निर्णय घेतलाय.
No comments:
Post a Comment