यामध्ये दोन्ही आर एम ओ, डॉ. संतोष शहाणे, डॉ. राम आव्हाड सह डॉक्टर, नर्स,कार्यालयीन कर्मचारी व आरोग्य सेवेतील कर्मचारी यांची उशिरा येण्याची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाचा गेटवरच उशिरा येणार्या कर्मचार्यांची डॉ.सुरेश साबळे हजेरी घेतली. उशिरा येणार्या कर्मचार्यांचे मात्र तारांबळ उडाल्याचे पाहिला मिळाले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या आधीसेविका मेट्रन रमा गिरी यांची उपस्थिती होती. मुख्य गेटवर कारवाई सुरू असल्याने दुसरे गेट बंद करण्यात आले होते. मात्र काही कर्मचार्यांनी आपली गाडी बाहेर पार्क करत भिंतीवरून उडी मारून आत मध्ये येण्याचा प्रयत्नही अनेक कर्मचार्याकडून झाला. मात्र त्यांची देखील उशिरा आल्याची नोंद घेतली. कर्मचार्याकडून असा हलगर्जीपणा केला जात असेल तर यापुढे त्यांच्याकडे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
No comments:
Post a Comment