Monday, February 20, 2023

12 परीक्षेबाबत बोर्डाकडून मोठी घोषणा. यंदाच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान 10 मिनटं जास्तीचा वेळ दिला जाणार.


मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना संबोधित केलं. यावेळी बोर्डाकडून राबवण्यात येणारं कॉपी मुक्त अभियान त्यांनी अधोरेखित केलं. शिवाय यंदाच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान 10 मिनटं जास्तीचा वेळ दिला जाणार असल्याचंही बोर्डाकडून सांगण्यात आलं. पेपरच्या शेवटी ही दहा मिनटं देण्यात येतील.

इयत्ता 12 वी साठीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत पार पडेल. यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार असून. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.तब्बल 3196 मुख्य केंद्रावर ही परीक्षा पार पडेल.परीक्षेसाठी यंदा मुलींची 6,64,461 इतकी संख्या असेल, तर मुलांची संख्या लाखांवर असेल.यंदाच्या वर्षी बोर्डाकडून कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. ज्यामुळं भरारी पथकं आणि बैठी पथकं केंद्रांवर असणार आहेत.विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटी 10 मिनिंटांचा वेळ त्यांना वाढवून देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment