Wednesday, January 18, 2023

महसूल विभागाची वाळू साठ्यावर धाड; सिंधफणा नदी पात्रात केली कारवाई.



बीड (प्रतिनिधी) कुक्कडगाव येथील सिंधफणा नदीच्या पात्रात वाळू साठवून ठेवल्याची माहिती महसूल विभागाला झाल्यानंतर आज मंडल अधिकार्‍यांसह तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई करत पाच ब्रास वाळू जप्त केली.

सिंधफणा नदी पात्रातून अनाधिकृतपणे वाळुचा उपसा सुरू आहे. कुक्कडगाव शिवारात वाळू उपसून ठेवल्याची माहिती महसूल विभागाला झाल्यानंतर मंडल अधिकारी विघ्ने व तलाठी थापडे, खिंडारे यांनी घटनास्थळी जावून कारवाई करत पाच ब्रास वाळू जप्त केली. दरम्यान ही कारवाई तहसीलदार सुहास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

No comments:

Post a Comment