मुंबई : (प्रतिनिधी) राज्यातील सर्वसामान्य जनतेला लवकरच वीज दरवाढी झटका बसण्याची शक्यता असून, या संदर्भात महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेनुसार सरासरी 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरण कंपनीने सादर केला.
साल २०२० मध्ये महातविरण कंपनीने वीजेच्या दरात वाढ केली होती. हे दर २०२५ पर्यंत कायम राहणार होते. मात्र गेल्या दोन वर्षात महावितरणाचे बरेच नुकसान झाले आहे. अनेक व्यक्तींनी कोरोना काळत वीज बिल भरले नाही. तसेच वीज गळती, खासगी वीज निर्मिती कंपनीला द्यावे लागणारे अतिरिक्त पैसे. यामुळे महावितरणाचे नुकसान होत आहे. त्यानुसार वीज दरवाढ व्हावी यासाठी महावितरणने आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेवर विभागांनुसार सहा वेगवेगळ्या ठिकाणी सुनावणी होणार असून, मार्च २०२३ पर्यंत अंतिम दरवाढ ठरेल आणि एप्रिल २०२३ पासून हे वाढीवदर नव्याने आकारले जाऊ शकतात.
No comments:
Post a Comment