परळी वैजनाथ ( प्रतिनिधी.) आज लोकांचा बातम्या बघण्याचा, बातम्या वाचण्याचा कल आणि अभिरुची बदललेली आहे. लोकांना भडक राजकीय बातम्यांकडे जास्त उत्साह आणि कल असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असो अथवा प्रिंट मीडिया असो तशाच प्रकारच्या भडक बातम्या देत आहेत.यामुळे जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊन ते बाजूलाच पडत आहेत असे प्रतिपादन साम टीव्ही च्या ब्यूरो चीफ रश्मी पुराणिक यांनी केले. त्या परळी येथे दैनिक मराठवाडा साथी व राधा मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
दर्पण दिनानिमित्त परळी येथील औद्योगिक वसाहतीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनंत भातांगळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणी, ज्येष्ठ पत्रकार जी एस. सौंदळे उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार मोगरकर सर यांनी आपला शुभेच्छा संदेश पाठवला होता. यावेळी पुढे बोलताना रश्मी पुराणिक म्हणाल्या की, पूर्वीची पत्रकारिता आता राहिली नाही. किंवा पत्रकारितेला आता पूर्वीसा
रखे दिवस येणे शक्य नाही. सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रकारे नव्या पत्रकारितेचा उदय झाला आहे.
रखे दिवस येणे शक्य नाही. सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रकारे नव्या पत्रकारितेचा उदय झाला आहे.
सध्या जी पत्रकारिता चालू आहे ती पत्रकारिता निश्चितच प्रबोधनकारी आहे असे मला वाटत नाही. लोकांनाही सामाजिक किंवा जनतेचे निगडित प्रश्नांना काही देणे घेणे नाही. सर्वसामान्य लोकांचा राजकीय बातम्या पाहण्याकडेच जास्त कल आहे. टीआरपी वाढवण्यासाठी मग कधी कधी नको असलेल्या बातम्यानाही ब्रेकिंग न्यूज करावी लागते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असो अथवा प्रिंट मीडिया असो राज्यकर्त्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे लागलेली दिसते. भविष्यात पत्रकारितेत कोणी जास्त दिवस टिकेल असे दिसत नाही.
याप्रसंगी जी. एस. सौंदळे, अनंत भातांगळे, सतीश बियाणी यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार धनंजय आरबुने यांनी मानले. परळीतील संपादक , तसेच विविध पत्रकारांनी रश्मी पुराणिक यांचा सत्कार केला.

No comments:
Post a Comment