*दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने लातूर येथे श्रीराम कथा; भाविक भक्तांची मोठी उपस्थिती.
लातूर (प्रतिनिधी) गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने ५ ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या पाठीमागील ग्राउंड मध्ये सात दिवसीय भव्य श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री राम कथेच्या पाचव्या दिवशी प.पु. सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपा पात्र शिष्य सुश्री श्रेया भारतीजींनी प्रभू श्रीरामचंद्र व भरत यांच्यातील प्रसंग, सुखी जीवनाचा मार्ग तसेच प्रभू श्रीरामचंद्रजींच्या क्रांतिकारी कार्याविषयी माहिती दिली. जेव्हा-जेव्हा या पृथ्वीतलावर महान व्यक्ती येतात तेव्हा ते समाजाला सुंदर बनवण्याचे व्रत घेतात.समाज बदलण्यासाठी, ते सुधारण्यासाठी, ते तयार करण्यासाठी.त्याचप्रमाणे सर्वश्री सद्गुरु आशुतोष महाराजजींनीही समाज बदलण्याचे व्रत घेतले. भरकटलेल्या तरुणांना महाराजजींनी योग्य मार्ग दाखवला. कथाव्यास यांनी सांगितले की जेव्हा जेव्हा जग रुद्रवाद, अंधश्रद्धेच्या अंधारात ग्रासले होते, तेव्हा तत्त्वज्ञ ब्राह्मनिष्ठ सद्गुरूंनी समाजाला नवी दिशा दिली. आज पुन्हा गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली लाखो अनुयायी समाजाच्या उन्नतीसाठी निश्चय करत आहेत.
ड्रग्जमुळे अनेक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे, त्यासोबतच तरुण वर्गाच्या व्यक्तिमत्त्वावरही विपरीत परिणाम होत आहे, वृद्धांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन संस्कारहीन आणि चारित्र्यहीन होत आहे. आज ही समस्या आपल्या समाजापुढील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. त्यासाठी अध्यात्म सोबत घ्यावे लागेल.कथेच्या शेवटी कथा व्यास यांनी सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या अंतर्गत सामाजिक कल्याणासाठी अनेक प्रकल्प चालवले जात आहेत. तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी सॅम प्रकल्प राबविला जात आहे. मंथन प्रकल्पांतर्गत गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. दिव्यांगांच्या मदतीसाठी अनोखा असा अंतर्दृष्ठी प्रकल्प राबविला जात असून, त्यात त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला जातो. संस्थेच्या संतुलन प्रकल्प अंतर्गत वेळोवेळी महिला जागृतीसाठी विविध कार्यक्रम, पदयात्रेचे आयोजन केले जाते. या भव्य कार्यक्रमात युवाशक्ती निस्वार्थीपणे योगदान देऊन समाजासमोर आदर्श निर्माण करत आहे. देश-विदेशातील लाखो भाविक त्याचा दुर्मिळ लाभ घेत आहेत. या दिव्य आणि अनोख्या शिबिराचे सर्व लाभ तुम्हीही घेवू शकता.
पाचव्या दिवशी च्या कथेसाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री सुधाकरजी शृंगारे खासदार लातूर लोकसभा मतदारसंघ. गणपतराव बाजुळगे, अशोक गोविंदपुरकर, ह.भ.प. कैलास महाराज मद्दे लिंगाळकर , बळवंत जाधव , डी.एन केंद्रे , संगमेश्वर केंद्रे, देविदास काळे, अविनाश देवशेटवार, अर्जुन जाधव ,गोविंद चिलकुरे , बापू भिंगे सतीश भिक्का पुरुषोत्तम नोकजा, शेवटी पावन पुनीत आरतीने श्रीराम केथेच्या पंचम दिवसाची सांगता झाली.तसेच पंडित गडदे श्रीकांत कदम व अशोक कासनाळे यांच्या वतीने प्रसाद वितरित करण्यात आला.
No comments:
Post a Comment