Thursday, January 12, 2023

लातुर विभागातील जलद गाड्याही चंदन सावरगांवला थांबणार.विद्यार्थी आणि पालकांमधे आनंद अनेक वर्षांच्या मागणीला यश.


केज  (प्रतिनिधी) केज ते अंबाजोगाई राज्य महा मार्गावरचे एक महत्वाचे गांव म्हणजे चंदन सावरगांव आहे. 

भाटुंबा,उंदरी,केकत सारणी,कळमअंबा व जवळबन यांना जोडणारा एक महत्वाचा थांबा असणारे गांव.निजामकाळापासुन हे गांव मध्यवर्ती व महत्वाचे ठरले होते.या ठिकाणापासुन अनेक जोडणाऱ्या गांवाचे शालेय व कॉलेजचे विद्यार्थी केज ला येतात.परंतु जलद गाड्या न थांबल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांची कुचंबना होत होती.

या सर्व बाबी लक्षात घेवुन गेल्या दोन वर्षापासुन निवेदने व रस्ता रोको करण्यात आला होता.याचाच परिपाक म्हणुन आज पासुन लातुर विभागाच्या जलद गाड्या या ठिकाणी थांबणार असल्याचे पञ विभागीय नियंञक बिरादार साहेबांनी दिले आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी उपसरपंचपुत्र शंकरबापू तपसे, माजी सरपंचपुत्र दिपक वाघमारे,पृथ्वीराज कापरे, सुनिल कापरे, राम जोगदंड, मगर मामा, मदन तपसे,रामु तपसे, दादाराव गवळी,दत्ता शेंडगे, पांचाळ उतरेश्वर ,चेअरमन कुमार तपसे,पञकार रामदास तपसे, प्रा.गणेशराव चाळक इत्यादींनी प्रयत्न केले होते.

चंदनसावरगाव परिसरातील भाटुंबा, जवळबन, कळमआंबा, केकतसारणी , मानेवाडी, कुंभारवाडा आणि उंदरी या गांवातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment