Sunday, January 22, 2023

अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा यशवंत सेनेचे आंदोलन.

पाटोदा(प्रतिनिधी): अहमदनगर चे नामांतर करून अहिल्यानगर करण्यासाठी यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने पाटोदा तालुक्यातील उकांडा फाटा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नामफलक कट्टा यावर अहमदनगर चे नाव हटवून अहिल्यानगर आंदोलकांच्या वतीने करण्यात आले नगर चे नाव अहिल्यानगर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करण्यात येत आहे अधिवेशनादरम्यान हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता यात संबंधित खात्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी या नामांतराचा प्रस्ताव तात्काळ मागणी च्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या परंतु या प्रस्ताव अद्यापही शासनाकडून सरकारकडे देण्यात आला नाही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य कन्याकुमारी ते परळी वैद्यनाथाच्या मंदिराचा जिर्णोद्वार महादेवांच्या मंदिराचे जिर्णोद्वार करणार्‍या शूरवीर महाराणी यांचे नाव अहिल्यानगर तात्काळ नामांतर करून देण्यात यावे नाहीतर येणार्‍या काळात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यशवंत सेना धनगर समाजचे नेते भारत सोन्नर यांनी दिला आहे या आंदोलनास मोठ्या संख्येने अहिल्याभक्त सहभागी झाले होते

No comments:

Post a Comment