Friday, January 13, 2023

अ.भा.वारकरी मंडळाच्य वतीने जिजाऊ जयंती निमित्त संगम येथे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार सोहळा थाटात संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जिजाऊ जयंती निमित्त सकाळच्या सत्रात जिजाऊंच्या प्रतीमेचे पुजन करून  ध्योजारोहण   शिवश्री धनंजय कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले जिजाऊ वंदना जनाई कोकाटे,श्रावणी कोकाटे.आनंदी कोकाटे,अकिंता चव्हाण यांनी जिजाऊ वंदना गायली. यावेळी उपस्थित शिवश्री शिंदे.शिवश्री  सिरसाट,शिवश्री राजाभाऊ गिराम, बब्रुवान गिराम. सरपंच अच्युत चव्हाण, माजी सरपंच वच्छालाबाई कोकाटे  उपस्थित होत्या यावेळी वैजनाथ सोळंके यांचे जिजाऊ चरिञ व्याख्यान झाले. 
सकाळचे सञा मध्ये संपन्न संध्याकाळचे सञामध्ये जिजाऊ पुरस्कार  परळी जवळील संगम येथे जिजाऊंच्या असंख्य लेकींचा जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार सोहळा थाटत  संगम येथे संपन्न जिजाऊरत्न पुरस्कार सोहळ्यासाठी कर्तुत्वान महिलांचा राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आलेल्या मान्यवरांच स्वागतगीताने स्वागत करून मान्यवरांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब  देशमुख पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजयजी केंद्रे साहेब ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे  बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथरावजी सोळंके उपनगराध्यक्ष रवींद्र भैय्या परदेशी महेश बँकेचे उपाध्यक्ष शिवरत्नजी मुंडे सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल सामाजिक कार्यकर्त्या किसकिंदाताई पांचाळ संगम सरपंच अच्युत चव्हाण शिवचरित्रकार प्रतिभाताई गायकवाड माजी सरपंच वच्छालाबाई कोकाटे  यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कार महिलांना देण्यात आला विविध क्षेत्रातील कर्तुत्वन महिला अध्यात्मिक शैक्षणिक आरोग्य विभाग  सामाजिक क्षेत्रातील महिलांना कर्तुत्वान महिलांना अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोक महाराष्ट्र राज्य राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने संगम येथे जिजाऊ रत्न पुरस्कार मानपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला. 
अनेक मान्यवरांनी जिजाऊ मा साहेबांच्या कार्याचं कौतुक करून उपस्थित महिलांना जिजाऊंचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आताच्या युगात  जिजाऊंच्या लेकीने प्रेरणा घ्यावी  कर्तुत्वान जिजाऊंच्या लेकीचां आपल्या कार्यामुळे आज राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार आपणास हा बहुमाण मिळालेला आहे असे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय  केंद्रे साहेब यांनी बोलतांना व्यक्त केले आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ फेटा बांधून ह. भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवश्री राजेभाऊ गिराम. माणिक गिराम. बब्रुवान गिराम.  अंकुश गिराम.  प्रभाकर गिराम. मुक्तेश्वर गिराम. बबन कोकाटे. परमेश्वर कोकाटे.देवीदास रोडे,पञकार महादेव गित्ते,कृष्णा गिराम,आनिकेत गिराम,  ऋषिकेश जाधव . प्रताप कोकाटे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य शिवाजी हारणावळ,सौ.मंगलताई दत्ताञ्य गिराम, प्रा. डॉ. प्रकाशजी फड. पत्रकार आत्मलिंगी शेटे.पोलीस पाटील पांडुरंग रोडे,श्रीनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा फोटोग्राफर असोसिएशनचे माजी अध्यक्ष यशवंत बापू चव्हाण.साहेबराव भुतांगळे. कार्यक्रमाचे संचालन ह भ प नामदेव महाराज गिरी यांनी केले तर आभार हभप रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केलं

No comments:

Post a Comment