Friday, December 9, 2022

बीड जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध.

बीड (कांतीकारी साथी न्युज) जिल्ह्यात ग्रामपंचायतीचा धुरळा उडाल्याचा पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील होऊ घातलेल्या 704 ग्रामपंचायतच्या  निवडणुकीपैकी 37 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील 704 ग्राम पंचायतींच्या  निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान आहे. यावेळी सरपंच निवड थेट जनतेतून आहे. त्यामुळे चुरस तर वाढलीच आहे. शिवाय इच्छुकांच्या संख्येतही भर पडली. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान सदस्य पदांसाठी 19 हजार 784 तर सरपंचपदासाठी 4 हजार 255 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 6 डिसेंबरला छाननी प्रक्रिया पार पडली.

२२० अर्ज बाद

सरपंच व सदस्यपदाचे 220 अर्ज बाद झाले असून एकूण 23 हजार 468 अर्ज वैध ठरले आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 7 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. यामध्ये 37 ठिकाणच्या ग्रामपंचायतचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

No comments:

Post a Comment