परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दुकानात सोन्याचे दागिने बघायला आलेल्या तीन महिलांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची धक्कादायक
घटना शहरातील सराफा बाजारात घडली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिलांविरोधात सराफा व्यापारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
लग्न सराई सुरू असल्याने सराफा बाजारात महिलांची मोठी गर्दी दिसून येते. परळी शहरातील बालाजी टाक यांच्या सराफा दुकानात तीन अनोळखी महिला सोन्याचे दागिने घ्यायचे आहेत, असे सांगून दुकानात शिरल्या. सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी दाखवलेल्या विविध सोन्याच्या दागिन्यांपैकी एक सोन्याचे 26.700 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठन मिलीमिनी गंठन ज्याची किंमत 1 लाख 38 हजार 840रु. आहे. हा दागिना सराफा व्यापाऱ्यांची नजर चुकवत त्यांनी चोरून नेला. दागिना चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यावर सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली. शहर पोलीस ठाण्यात 277/2022 कलम 379 भादवि. नुसार तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाण्याचे कर्मचारी भास्कर केंद्र करत आहेत.

No comments:
Post a Comment