Tuesday, December 6, 2022

परळीतील मोकाट बेवारस व पिसाळ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा- मा.धर्माधिकारी व पठाण यांची मागणी.



परळी वैजनाथ.(प्रतिनिधी) नगर परिषदेने मोकाट व पिसाळनाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व जाबेरखाॅं पठाण यांनी केली आहे.  श्वान दक्षता व नियंत्रण कक्षाची स्थापना करुन परळीतील मोकाट व पिसाळ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा,शहरातील मोकाट कुत्र्यांची सरसगट नसबंदी करण्यासाठी निर्बिजीकरण मोहिम राबविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.शालेय विद्यार्थी, जॉगींगसाठी जाणारे नागरिक यांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची सरसगट नसबंदी करण्यासाठी निर्बिजीकरण मोहिम राबविण्यात य येणे अत्यंत आवश्यक आहे. .नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असेल तर  तक्रार दाखल करण्यासाठी तसेच आपल्या पाळीव कुत्र्याची नोंदणी करणे आणि त्याला  रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्यासाठी स्वतंत्र  डॉग कंट्रोल सेल निर्माण करावा. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाबरोबरच कोंडवाडा व डॉग हाउस निर्माण करावे याठिकाणी श्वान पकडून आणून त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

परळी शहरात अनेक भागात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून काल अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.गणेशपार भागात तसेच अंबेवेस, गोपणपाळे गल्ली मोंढा भागात पिसाळलेले मोकाट कुत्रे आढळून येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
परळी शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे जेणेकरून मोकाट कुत्रे हिंसक होणार नाहीत. याबाबत आज नगर परिषदेला निवेदन देण्यात आले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण उपस्थित होते. प्रशासक यांच्या वतीने कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे यांनी निवेदन स्वीकारले.

No comments:

Post a Comment