Saturday, December 3, 2022

वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याकडून विज चोरी लाईट बील वाचवण्यासाठी अनोखी शक्कल.

बीड (कांतीकारी साथी न्युज) बीड जिल्हा कारागृहात वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यानेच विज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवासस्‍थानाच्‍या  मीटरचा वापर न करता कारागृहातील मीटरमधून वीज वापर केल्‍याचा प्रकार उघड झाला आहे.
बीड  जिल्‍हा कारागृहातील वरिष्‍ठ अधिकारीने आपल्‍या निवासस्थानात स्वतंत्र विद्युत मीटर असताना देखील मीटर बंद करून थेट जेलच्या विद्युत मीटरमधूनच गेल्या तीन वर्षापासून वीज वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. जेलचे कर्मचारी वेळेवर विज बिल भरत असताना अधिकारी मात्र फुकटची वीज वापरत असल्याने संताप व्यक्त केला जात आहेत.

कारवाईची मागणी

एकीकडे थकीत वीजबिलापोटी शेतकऱ्यांची ऐन हंगामात विज तोडणी केली जात आहे. तर दुसरीकडे लाखो रुपयांचा पगार उचलणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच जिल्हा कारागृहाची वीज वापरणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी अन तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment