औरंगाबाद (प्रतिनिधी) गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ओझर या गावात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून, आमच्या नातीला तुझ्या नातवाने पळवून नेले.! असा आरोप करत एका वृध्द महिलेला तिघांनी घरी नेऊन विवस्त्र करत मारहाण केली आहे. याप्रकरणी पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पीडित वृद्ध महिला गंगापूर तालुका ओझर गावातील भेंडाळा शिवारात राहत असून, ओझर येथीलच तिघांनी घरी नेऊन विवस्त्र करून मारहाण केली व आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ओझर येथे राहणारे आरोपी 1. विवेक उर्फ चावल्या पिंपळे 2. भावड्या पिंपळे 3. नितुबाई पिंपळे या सर्वांनी मिळून शनिवारी दुपारी गंगापूर शिवारात राहणाऱ्या वृध्द महिलेच्या घरी जाऊन तुझ्या नातवाने आमच्या मुलीला पळवून नेले असा आरोप केला.! व महिलेला गाडीत बसवून मुलीला शोधायला जायचे आहे सांगून सोबत घेतले. त्यानंतर ओझर या ठिकाणी घरी नेऊन विवस्त्र केले. आमची मुलगी कोठे आहे, असे विचारत डांबून ठेवले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
सदर पीडित महिला मारहाण करू नका अशी विनवणी करत असताना देखील, आरोपींनी तिला मारहाण केली आणि त्याचे चित्रण केले. तर त्यानंतर ते सोशल मिडियावर व्हायरल देखील केले. दरम्यान, याप्रकरणी रविवारी रात्री गंगापूर पोलिस स्थानकात या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिलेला रात्री उशिरा सोडून देत; आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर तुला जीवे मारू अशी धमकी देखील आरोपींनी पिडीत महिलेला दिली. घटनेचा अधिक तपास पो.नि. रवींद्र खांडेकर हे करीत आहे
No comments:
Post a Comment