Tuesday, December 6, 2022

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचार्‍यांवर होणार कारवाई.

बीड (प्रतिनिधी) तालुक्यात 132 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून सदरील निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजपासून 12 तारखेपर्यंत हे प्रशिक्षण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आयटीआय बीड येथे होणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी अधिकारी,कर्मचारी गैरहजर राहीले तर शिस्तभंगाच्या कारवाईसह पोलिस कारवाई करण्यात येईल. या गंभीर बाबीची संबंधित कर्मचारी,अधिकार्‍यांनी नोंद घ्यावी असे तहसील कार्यालय बीड,ग्रामपंचायत निवडणूक विभाग व राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी सुहास हजारे यांनी प्रेस नोट काढून सांगितले आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून या अनुषंगाने बीड तालुक्यातील 132 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आला आहे. सदर निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर अधिकारी,कर्मचारी यांना नेमणूक देण्यात येऊन आज 6 डिसेंबर 2022 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आयटीआय येथे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणास काही कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून येत आहे. निवडणूक आयोगाच्या महत्वपूर्ण कामात निष्काळजीपणा करणे , कार्यतत्परता न ठेवणे यासाठी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात येत आहे. सदरील निवडणुकीच्या कामात निष्काळीजपणा,कामचुकारपणा केला तर कर्मचार्‍याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून या उपरही संबंधित कर्मचारी गैरहजर राहीले तर त्यांच्याविरूध्द पोलिस कारवाई करण्यात येणार आहे असा आदेश तहसीलदार बीड,राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी सुहास हजारे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आयोजित केलेल्या प्रशिक्षणास कर्मचारी,अधिकारी यांनी उपस्थिती नोंदवून प्रशिक्षण घ्यावे व कारवाई टाळावी असे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment