Thursday, December 1, 2022

स्वतःसत्तेत असताना नेमलेल्या मुख्याधिकारी महोदयांच्या विरोधात निवेदन, घोषणाबाजी हे सारे हास्यास्पद :- वैजनाथ कळसकर.


*राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा आरशात स्वतःचे अवलोकन करावे, बील अडकले राष्ट्रवादीवाले भडकले आणि नगरपरिषदेची तिजोरी रिकामी. करणारेच करत आहेत. कर वाढीला विरोध यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नगर परिषदेवर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ अर्थात सन २०११ पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने कब्जा केलेला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतः सत्ता असताना एप्रिल - मे महिन्यात नगर परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी पदी नेमलेल्या सुंदर बोंदर यांच्या विरोधात दि. ३० नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन घोषणाबाजी करत आंदोलन करणे हे हास्यास्पद आहे. तसेच नगरपरिषदेची तिजोरी रिकामी करणारेच करत आहेत 
कर वाढीला विरोध यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा आरशात स्वतःचे अवलोकन करावे असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे परळी वैजनाथचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

सोबतच गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांत एकहाती आणि मनमानीपणे सत्ता राबवणारे लोकंचं जर विरोधकांच्या भूमिकेत गेलेले बघून जनता यांच्यावर हसत आहे. हे म्हणजे यांचेच स्टेडियम, यांचेच खेळाडू, यांचेच स्पर्धक, हेच पंच, आणि प्रेक्षकही हेच. थोडक्यात प्रशासक आल्याने ह्या लाभार्थी मंडळाचे धाबे दणाणलेले आहे म्हणून यांना धाप्यांची आठवण यायला लागली आहे. बिल अडकले की राष्ट्रवादी भडकली ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असे प्रतिपादन वैजनाथ कळसकर यांनी केले आहे.

उलटपक्षी राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केलेला दलित वस्तीचा मुद्दा तर अतिसंवेदनशील आहे, याची तत्काळ चौकशी होऊन तथ्य निघाल्यास दोषींवर तात्काळ अट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. 

मुळात विषय राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना नेमलेले प्रशासक मुख्याधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचा असताना इतरांच्या विरोधात घोषणाबाजी करणे गैरलागू होते. अशा घोषणा देणाऱ्या आणि बनवाबनवी करणाऱ्या मंडळींच्या कृतीचा मनसे तीव्र निषेध करत आहे आणी हेच...? नगरपरिषदेची तिजोरी रिकामी करणारेच करत आहेत
कर वाढीला विरोध यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा असे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

No comments:

Post a Comment