Saturday, December 31, 2022

नवरा-बायकोचे भांडण सोडविणे पडले महागात. जावयाने घेतला सासऱ्याला चावा.


*दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या जावयाला समजावून सांगत असतानाचा प्रकार. 

केज (कांतीकारी साथी न्युज) : नवरा - बायकोचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सासऱ्याच्या अंगावर ठोंब्या घेऊन धावलेल्या जावयाने हाताला कडाडून चावा घेतला. ही घटना २६ डिसेंबरला शहरातील समता नगरात घडली.

अश्विनी व पती बन्सी हंकारे हे जवळबनचे रहिवासी असून, सध्या समतानगरात वास्तव्यास आहेत. बन्सी हंकारे हा दारु पिऊन पत्नी आणि मुलास नेहमीच मारहाण करीत असे. २६ रोजी अश्विनीचे वडील उत्तम रंगनाथ मस्के हे केज येथील मुलीच्या व जावयाच्या घरी गेले व जावई बन्सी हंकारे याला समजून सांगत होते. बन्सी हंकारे याने सासऱ्याचे गचुरे धरून मारहाण केली. तसेच सासऱ्याला मारण्यासाठी हातात दगडी ठोंब्या घेऊन अंगावर धावला. रागाच्या भरात बन्सी हंकारे याने सासरा उत्तम मस्केच्या हाताच्या डाव्या मनगटाला कडकडून चावा घेतला आणि दुखापत केली.

याप्रकरणी अश्विनी हंकारे हिच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक बाळराजे सोनवणे अधिक तपास करीत आहेत

आष्टी तालुक्यातील देवस्थान जमीन घोटाळा; तपास धिम्यागतीने, यंत्रणेवर दबावाचा आरोप. तक्रारदाराची अप्पर मुख्य सचिवांकडे धाव.

आष्टी (कांतीकारी साथी न्युज) : आष्टी तालुक्यातील कथित आठ हिंदू देवस्थान जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात २९ नोव्हेंबरला आष्टी ठाण्यात भाजपचे आ. सुरेश धस यांच्यासह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. मात्र, महिना उलटूनही यातील एकाही आरोपीला अटक झाली नाही. त्यामुळे तक्रारदार राम खाडे यांनी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे दाद मागितली आहे.
आष्टी तालुक्यातील आठ हिंदू देवस्थानांच्या एक हजार कोटी रुपयांचे बाजार मूल्य असलेल्या २१२ हेक्टर जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याप्रकरणी राम खाडे यांनी १३ जानेवारी २०२२ रोजी तक्रार केली होती. त्यानंतर ३२० दिवसांच्या नाट्यमय प्रवासानंतर सर्वोच्च न्यायालयाने आ. धस यांची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचे गुन्हा नोंदविण्याचे आदेश कायम ठेवले. त्यामुळे २९ नोव्हेंबरला आष्टी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद झाला. मात्र, महिना उलटूनही एकाही आरोपीला अटक न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर राजकीय दबाव असल्याचा दावा राम खाडे यांनी केला आहे. याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई, अशी मागणी खाडे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. सुरेश धस यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
चार पानांच्या तक्रारीत गंभीर आरोपराम खाडे यांनी अपर मुख्य सचिवांना चार पानी निवेदन दिले आहे. त्यात आ. सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते सत्ताधारी पक्षाचे असल्याने तपास यंत्रणेवर दबाव आणत आहेत. गुन्हा नोंद झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी न्यायालयीन आदेशाची पायमल्ली केली. आपल्यावर अहमदनगर जिल्ह्यात खोटा गुन्हा नोंदवून मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला. एसआयटीतील आयपीएस अधिकाऱ्यास बदलण्याची खेळी देखील त्यांनी केलेली असल्याचा दावा निवेदनात केला आहे.
आठ देवस्थानांच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण आहे. यासंदर्भात तपासासाठी आवश्यक दस्ताऐवज महसूल विभागाकडून मागविलेले आहेत. कोणाच्याही दबावात न येता निष्पक्षपातीपणे तपास करण्याचे काम सुरू आहे.- शंकर शिंदे, उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड

ट्रॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालक कॅबीनच्या बाहेर पडला. रस्त्यावर कोसळून झाला मृत्यू.

 


*रात्री १० वाजेच्या सुमारास खड्ड्यात ट्रॅक्टर आदळून चालक बाहेर फेकला गेला. 

कडा (कांतीकारी साथी न्युज)  खड्ड्यात ट्रॅक्टर आदळल्याने कॅबीनमधून रोडवर फेकल्या गेलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिरापूर येथे घडली आहे. अक्षय भाऊसाहेब सांगळे ( रा.कडा) असे मृत तरूण चालकाचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कडा येथील अक्षय भाऊसाहेब सांगळे ( २४ रा.कडा ) हा तरूण ट्रॅक्टर चालक आहे. तो शुक्रवारी रात्री शिरापूर येथून ट्रॅक्टर चालवत कड्याकडे येत होता. दरम्यान, शिरापूरजवळ रोडवरील एका खड्ड्यात टॅक्टर जोरात आदळले. यावेळी स्टेअरिंगवरील ताबा सुटून अक्षय कॅबीनबाहेर फेकला जाऊन रस्त्यावर कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

ग्रामस्थांकडून माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. आज सकाळी शोकाकुल वातावरणात कडा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अवैध वाळू वाहतूकीच्या बळीची चर्चा 

शिरापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून नदीपात्रातून अवैध वाळू उपासा केला जात आहे. रात्रीअपरात्री या मार्गावरून खुलेआम वाहतूक केली जाते. तसेच अक्षय हा याचा अवैध वाळू वाहतूकीचा बळी असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

परळी वैजनाथ येथे श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ.हरीपाठ, भजन, कीर्तनाचेही आयोजन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)   परळी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या वतीने श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.30 डिसेंबर पासून या कार्यक्रमास भव्य प्रारंभ झाला असून या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभत आहे.
परळीतील गुरूकृपानगर येथील हरेगावकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराणाचे पारायण करण्यात येत असून पारायणप्रमुख सौ.लताताई येळाये यांच्या मार्गदर्शना खाली हा सोहळा संपन्न होत आहे. 

तर सायंकाळी 5 ते 7 या वेळेत  हरीपाठ, भजन, कीर्तन आदी धार्मीक कार्यक्रम संपन्न होत आहे. शुक्रवार पासून सुरू झालेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमास भाविक-भक्तांची मोठी गर्दी होत आहे. सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रातील व चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व हरीपाठ, भजन, कीर्तन श्रवणासाठी शहरातील महिला-पुरूष मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी कोष्टी समाजातील महिला, पुरूष परिश्रम घेत आहेत.

मोठी बातमी ! इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा..

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीचे २ मार्चपासून सुरू होणार आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर १९ सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले होते.

या वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षा कालावधी :

परीक्षा : कालावधीबारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) सर्वसाधारण व दिलक्षी विषय आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) : २ मार्च  ते २५ मार्च २०२३

शनीच्या साडेतीन पीठापैकी मुख्य पीठ असलेल्या राक्षसभुवन येथे शनिजन्मोत्सव सोहळा उत्साहात. हाजारो भाविकांनी घेतले दर्शन.

 गेवराई (कांतीकारी साथी न्युज) भारतातील शनीच्या साडेतीन पीठापैकी एक मुख्य पीठ  असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेञ राक्षसभुवन येथे शनी जन्मोत्सव सोहळा आज सायंकाळी ६ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांनी जयघोषात शनी महाराजांचे दर्शन घेतले.

जन्मोत्सवानिमित्त सकाळी मंदिरात अखंड तेलात्मक अतिरुद्ध तैलधारात्मक अभिषेकाची सांगता झाली. त्यानंतर महाअभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिर पाना-फुलांनी, रांगोळी काढून सजविण्यात आले होते. सायंकाळी ४ ते ६ यावेळेत रेणुकादास गणपत शास्त्री पाठक यांचे किर्तन झाले. तर सायंकाळी ६ वाजता जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच उद्या शनिवारी सकाळी १२ ते ५ यावेळेत महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष संतोष काटवटे व सचिव सुरेंद्रकुमार पाठक यांनी केले आहे

Friday, December 30, 2022

कोष्टी समाज मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथे श्री चौंडेश्वरी महोत्सवास उत्साहात सुरुवात.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) कोष्टी समाज मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथे श्री चौंडेश्वरी महोत्सवास आज शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई कोष्टी समाज मंडळाच्या वतीने श्री चौंडेश्वरी देवी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी मंदिर कोष्टी गल्ली अंबाजोगाई येथे दिनांक 30 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आठ दिवस श्री चौंडेश्वरी देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देवांग पुराण पारायण, भजन, कीर्तन, हरिपाठ ,जागरण गोंधळ आदि कार्यक्रम होणार आहे. आज शुक्रवारी सकाळी  श्री चौंडेश्वरी देवीची विधीवत पूजा  करण्यात आली. दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी श्री चौंडेश्वरी देवी महोत्सवाची सांगता पारायण समाप्तीनंतर होणार असून यानिमित्त देवांग पुराण ग्रंथ मिरवणूक अंबाजोगाई शहराच्या विविध मार्गावरून निघणार आहे. दररोज दुपारी चार ते सायंकाळी सात वाजता महिलांचे हरिपाठ व भजन होईल. दिनांक 6 जानेवारी रोजी कोष्टी समाजाचे अध्यक्ष नारायणराव हरेगावकर यांच्या हस्ते पहाटे चार वाजता श्री चौंडेश्वरी देवीची महापूजा सकाळी सात वाजता पूर्णहूती व सकाळी दहा वाजता ह भ प श्री अच्युतराव जोशी महाराज केंद्रेवाडीकर यांचे काल्याचे किर्तन व कीर्तनास श्री ह भ प अमोल घोडके महाराज सावतामाळी भजनी मंडळ यांची साथ होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल.
या सर्व कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी उत्सव व गोष्टी समाज मंडळ अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

राज ठाकरे नवीन वर्षात मराठवाड्यात ३ जानेवारीला परळीत राहणार उपस्थित.


परळी वैजनाथ (कांतीकारी साथी न्युज)न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 3 जानेवारी रोजी परळी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त येथे शुक्रवारी मराठवाडय़ातील मनसे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. 

मनसेचे परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी सांगितले की, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नववर्षात परळी दौरा होणार आहे. त्यांचे दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, गोपीनाथ गड  येथे हेलीकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर मोटारीने ते परळी कोर्टात उपस्थित राहतील. 

कोर्टात काय आहे प्रकरण ?

2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबई येथे अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले. परळी - धर्मापुरी पॉईंटवर कार्यकर्त्यांकडून दगडफेकीत बसचे नुकसान झाले होते. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यावर व चिथावणीखोर विधानाबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी परळी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासाठी राज ठाकरे परळी कोर्टात ३ जानेवारी रोजी हजर राहणार आहेत.

 मनसेकडून सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारमनसे नेते दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, राज्य उपाध्यक्षा वर्षा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या प्रसंगी मराठवाडय़ातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, शेख राज, रूपेश देशमुख, लातूर जिल्हाध्यक्ष संजय राठोड, शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्क्ष बालाजी मुंडे, जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुकाउपाध्यक्ष विठ्ठलराव झिल्मेवाड, ऋषिकेश बारगजे, हनुमान सातपुते, प्रशांत कामाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीत चोरी; साडेपाच लाख रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला.


*विद्युत प्रवाह बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी ट्रान्सफर्मरमधील कॉपरचे साहित्य लंपास केले. 

 केज (कांतीकारी साथी न्युज ) तालुक्यातील लव्हुरी शिवारातील लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सुतगिरणीमध्ये चोरीची घटना बुधवारी २८ डिसेंबर रोजी उघडकीस आली.  येथे स्वखर्चातून बसविलेल्या विद्युत ट्रान्सफर्मरमधील कॉपरचे 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
लव्हूरी शिवारात माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सतगिरणी उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. येथे विद्युत पुरवठा करण्यासाठी इस्लामपूर (  जि. सांगली) येथून पॉवर ट्रान्सफर्मर व इतर साहित्य सुतगिरणीने स्वखर्चातून खरेदी केले. हे साहित्य डिसेंबर २०२१ दरम्यान सूतगिरणीच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूला ईलेक्ट्रीक विभागात बसवले होते. सध्या या ट्रान्सफार्मरला विद्युत प्रवाहाची जोडणी केलेली नाही. दरम्यान, ७ डिसेंबर २०२२ रोजी कार्यकारी संचालक अनिल पाखरे व लेखाधिकारी विठ्ठल मुळे यांच्या तपासणीत साहित्य सुस्थितीत होते. 
दरम्यान, विद्युत प्रवाह बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी  ट्रान्सफर्मरमधील 6 कॉपर कॉइल्स, 800 किलो वजनाचे एपीएफसी पॅनलमधील कॉपर साहित्य व केबल असे 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. बुधवारी 28 डिसेंबर रोजी साहित्य चोरीस गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी लेखाधिकारी विठ्ठल मुळे यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात आज गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.

स्त्री-पुरुष तुलना ग्रंथाचे लेखक कोण? सीता की गीता? विद्यापीठ परीक्षेत गोंधळ सुरुच.विद्यार्थ्यांबरोबर साहित्यिकांनमध्येही संताप.

*मुलांच्या हाॅल तिकिटावर मुलींचे छायाचित्र येण्याचा प्रकार एका दिवसापूर्वी समोर आला होता. परंतु, त्यानंतरही परीक्षेत या ना त्या कारणाने गोंधळ सुरूच आहे.

औरंगाबाद (कांतीकारी साथी न्युज) ‘स्त्री-पुरुष तुलना, या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?’ या प्रश्नाचे पर्याय पाहून विद्यार्थ्यांना डोक्यालाच हात लावावा लागला. पर्याय होते सीता, गीता, नीता आणि सविता. बी. ए. प्रथम वर्षाच्या परीक्षेत मराठीच्या पेपरमधील या प्रश्नाचे पर्याय पाहून विद्यार्थ्यांबरोबर साहित्यिकांनीही संताप व्यक्त केला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रश्नाचे पर्याय बदलून देण्यात आले. त्यामुळे कोणाचीही अडचण झाली नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. आणि बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला. मुलांच्या हाॅल तिकिटावर मुलींचे छायाचित्र येण्याचा प्रकार एका दिवसापूर्वी समोर आला होता. परंतु, त्यानंतरही परीक्षेत या ना त्या कारणाने गोंधळ सुरूच आहे. ‘स्त्री-पुरुष तुलना, या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?’ हा प्रश्न आणि त्यासाठी दिलेले अजब पर्याय असलेला पेपर गुरुवारी सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. हा पेपर बुधवारी झाल्याचे एका विद्यार्थ्याच्या पालकाने सांगितले. 

विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळासंदर्भात अधिसभेच्या पदवीधर सदस्यांनी गुरुवारी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन हॉल तिकीट न मिळाल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत परीक्षेची संधी देण्यात यावी, परीक्षा प्रक्रियेकडे विशेष लक्ष देऊन पुढील परीक्षा सुरळीत घेण्यासाठी सूचना द्याव्यात, असे निवेदन दिले. यावेळी पदवीधर अधिसभा सदस्य डॉ. भारत खैरनार, दत्तात्रय भांगे, हरिदास सोमवंशी, डॉ. दीपक बहीर, निखिल सहस्रबुद्धे, राकेश खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरूंनी कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले जाणार नाही, परीक्षेची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना परत परीक्षेची संधी दिली जाईल, हॉल तिकीट न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पीआरएन नंबरवरती परीक्षेस बसू देण्याची परवानगी परीक्षा केंद्रांना दिली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

हाॅलतिकीट १० दिवसांपूर्वी मिळावे.

यापुढे होणाऱ्या परीक्षेचे अर्ज परीक्षेपूर्वी किमान १५ दिवस आधी भरून घेण्यात आले पाहिजे. हाॅलतिकीट परीक्षेच्या १० दिवसांपूर्वी वाटप करण्यात यावे. रिड्रेसलचा निकाल त्वरित लावावा.- दत्तात्रय भांगे

शिक्षण म्हणजे सत्य जाणून सुसंस्कृत नागरिक बनणे - कॅप्टन राजाभाऊ आठवले


*131 विद्यार्थ्यांना आम्रपाली व जय भीम बुद्ध विहार (पूरग्रस्त कॉलनी) वही पेन वाटप अभियान. 

 बीड (प्रतिनिधी) : शिक्षण म्हणजे सत्य जाणून सुसंस्कृत नागरिक बनणे,सर्वांशी मानवतेने वागून हिंसा,चोरी,खोटे बोलणे, व्यभिचार व मादक पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहून व त्यानुसार तसेच जीवनात आचरण करणे होय असे प्रतिपादन कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी केली.

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या 51 व्या स्मृतिदिनी आम्रपाली बुद्ध विहार व जय भीम नगर बुद्ध विहार परिसरातील विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी मिळालेल्या दानातून वही पेन वाटप अभियानातील पाचव्या फेरी प्रसंगी विनम्र अभिवादन करून एकूण 131 विद्यार्थ्यांना वाटप केले.
  अध्यक्षपदी असलेले कॅप्टन राजाभाऊ आठवले प्रमुख पाहुणे बी.डी. तांगडे, बप्पाजी जावळे, छाया शिंदे काशिनाथ वाघमारे, यांच्या हस्ते महामानवांना पुष्प, पुष्पमाला अर्पण करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डी. जी.वानखडे यांनी केले व महामानव अभिवादन ग्रुप, सेवानिवृत्त बहुजन आधिकारी संघ, वाचाल तर वाचाल फिरते मोफत असलेल्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.

 कॅप्टन आठवले यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवन जीवन कार्यावर प्रकाश टाकताना,डॉ बाबासाहेब यांच्या सोबत सावलीप्रमाणे राहून केलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन केले. ते म्हणा पुढे म्हणाले की लहानपण हे पिठाच्या गोळ्याप्रमाणे असते, त्याला जसा आकार दिला जाईल तसे पदार्थ बनू शकतात तरी लहानपणी आई-वडिलांच्या, गुरुजनांच्या आज्ञाप्रमाणे  राहून थोर व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील प्रगती करणे तसेच पालकांनी आपले पाल्य घडविण्याकरता पंचशीलाचे पालन करणे कसे गरजेचे आहे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामानव ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक वंजारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास आयु. चंद्राबाई ठोकळ, सीताबाई वडमारे, निविदिता वडमारे, सुनंदा वाघमारे, मोहिनी बनसोडे, दीपा सुरवसे, सोनाली जोगदंड, बबीता कोरडे ,आयु. दादा हरिदास गायकवाड, विशंभर बनसोडे, अमरसिंह ढाका, राजेंद्र वडमारे, भानुदास गायकवाड व परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका विद्यार्थी उपस्थित होते. महिला समता सैनिक दलाच्या कीर्ती शिंदे,आरोही जाधव, मनीषा गायकवाड, व सुनंदा वाघमारे, पूजा ससाने ओके यांनी कार्यक्रम यशस्वी करता बहुमोल परिश्रम घेतली सरनातयने कार्यक्रमाची सांगता झाली.

कर्नाटकातील बिदर मतदारसंघाचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा मन्मथ स्वामींच्या चरणी.


नेकनुर (कांतीकारी साथी न्युज) तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री संत मन्मथ स्वामी यांचे समाधीस्थळ श्रीक्षेत्र कपिलधार येथे आज केंद्रीय रसायन व ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी पत्नी व मुलासह भेट दिली. राज्यमंत्री खुबा यांनी सहकुटुंब मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत मोठ्या श्रध्देने अभिषेक केला.

कर्नाटकातील बिदर मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री भगंवत खुबा बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दुपारी त्यांनी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळी सहकुटुंब भेट दिली. देवस्थान पंचकमिटीकडून राज्यमंत्री खुब्बा यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज्यमंत्री खुबा यांनी मन्मथ स्वामींचे कुटुंबासह दर्शन घेतले. दरम्यान, राज्यमंत्री खुबा यांनी कपिलधार परिसराचा आढावा घेतला. यावेळी श्री मन्मथ स्वामी देवस्थान पंचकमिटीने मंदिरासाठी केंद्रीय निधीतून सौरपॅनल व पवन ऊर्जास्रोताची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी मागण्या लवकरच मान्य करून मार्गी लावू, असे आश्वासन दिले. 

आता निवडणूक आयोगाकडून रिमोट ईव्हीएम मशिन विकसित. मतदानासाठी गावी परतण्याची आता गरज नाही.


नवी दिल्ली — व्यवसायामुळे इतरत्र स्थायिक झालेल्या मतदारांना मतदानकरण्यासाठी आपापल्या गावाकडे यावे लागते. लोकांचा हा त्रास कमी व्हावा, याकरिता रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनद्वारे मतदान घेता येऊ शकते का, याची चाचपणी करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

रिमोट मतदानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्यात येणाऱ्या कायदेशीर आणि तांत्रिक अडथळ्यांवर आयोगाला सर्वप्रथम काम करावे लागणार आहे. मात्र रिमोट मतदानासाठीचे प्रात्याक्षिक मॉडेल आयोगाने तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील जवळपास एक तृतियांश लोक मतदान करीत नसल्याची बाब लक्षात घेऊन रिमोट मतदानाची संकल्पना विकसित केली जात आहे. नव्या स्वरुपाच्या या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा डेमो पाहण्यासाठी आयोगाने राजकीय पक्षांना निमंत्रित केले आहे.निवडणूक आयोगाने असे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन विकसित केले आहे की ज्या मशिनच्या माध्यमातून 72 मतदारसंघासाठी रिमोट मतदान करण्यासाठी व्यवस्था आहे. वर्ष 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 67.4 टक्के इतके मतदान झाले होते. याचा अर्थ त्यावेळी 30 कोटी लोकांनी मतदान केले नव्हते. विविध कारणांमुळे मतदानाची टक्केवारी घटत असते. त्यात कामा-धंद्यानिमित्त इतर ठिकाणी स्थायिक झालेल्या लोकांना मतदानासाठी आपल्या मूळ ठिकाणी परतता येत नसल्याचे प्रमुख कारण सामील आहे.देशातील किती लोक आपापल्या मूळ ठिकाणांहून कामा-धंद्यानिमित्त इतरत्र स्थायिक झाले आहेत, याचा अधिकृत आकडा सरकारकडे नसला तरी रिमोट वोटिंगमुळे अशा लोकांना मतदानाचा अधिकार बजावता येईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
काम-धंदा, शिक्षण, लग्न आदी कारणांमुळे लोक स्थलांतरित होत असतात. राज्याअंतर्गत होणारे स्थलांतरणाचे प्रमाण सुमारे 85 टक्के इतके आहे. रिमोट मतदानाचा डेमो येत्या 16 जानेवारी 2023 रोजी होणार असून निवडणूक आयोगाचे तांत्रिक तज्ज्ञ समितीचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत.
असे आहे रिमोट ईव्हीएम —
भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतीयांश लोक मतदानाचा हक्क बजावत नाहीत. त्याला कारणेही अनेक आहेत. त्यातील एक म्हणजे स्थलांतरित कामगारांचे कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी जाणे-येणे सुरु असते. यामुळे त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी मतदान करण्यासाठी जाणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) एक विशिष्ट प्रकारचे रिमोट इलेक्टॉनिक व्होटिंग मशिन विकसित केले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले की त्यांनी स्थानिक स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा एक नमुना विकसित केला आहे.निवडणूक आयोगाने एक मल्टी-कॉन्स्टिट्यून्सी EVM प्रोटोटाइप विकसित केले आहे ज्यामुळे दूरवर असणाऱ्यांना मतदान करता येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे. प्रोटोटाइप मल्टी-कॉन्स्टिट्यून्सी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (RVM) एकाच रिमोट मतदान केंद्रावरून अनेक मतदारसंघ हाताळू शकते. त्यामुळे स्थलांतरित मतदारांना मतदान करण्यासाठी त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्याची गरज नाही.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी 67.4टक्के होती आणि 30 कोटींहून अधिक मतदार त्यांच्या मताधिकाराचा वापर करत नसल्याची खंत निवडणूक आयोगाला आहे,” असे आयोगाने म्हटले आहे. ECI ने म्हटले आहे की मतदार त्यांचे रहिवाशी ठिकाण बदलल्यानंतर मतदार नोंदणी न करण्याची अनेक कारणे आहेत. त्यामुळे ते मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतात.देशांतर्गत होणारे स्थलांतर हे अनेकजण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याचे प्रमुख कारण आहे. त्यासाठी मतदानांच्या टक्केवारीत सुधारणा करण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग नोंदवण्याचा निवडणूक आयोगाचा (ECI) प्रयत्न आहे.

राज्यातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर. 30 जानेवारीला मतदान.

मुंबई — राज्यातील नगरपालिका महापालिका निवडणुकीची अनिश्चितता अजूनही कायम असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत.राज्यातील शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहीर करण्यात आली असून आगामी नव्या वर्षात 30 जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे.
नाशिक अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागासाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नववर्षात होणार आहे.महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.अशी घोषणा करण्यात आली आहे.

परळीत लव्ह जिहाद व धर्मांतराच्या विरोधात मूक मोर्चा.हिंदू समाज प्रचंड संख्येत रस्त्यावर.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) देशात लव्ह जिहाद व धर्मांतराच्या घटना रोज घडत आहेत या विरोधात आज परळी वैजनाथ येथे हिंदू समाज प्रचंड संख्येत रस्त्यावर उतरला.विराट हिंदू मोर्चाने परळी शहर दणाणले.तर बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी, महिला,अबाल वृद्धांनी व सर्वस्तरीय हिंदु बंधु भगिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला.


आज परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मुक मोर्चाचे आयोजन समस्त हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले.देशभरात मागील काही काळा पासून लव्ह जिहाद व धर्मांतराच्या घटनांत वाढ झाली आहे नुकत्याच श्रद्धाच्या घटनेने देश सुन्न झाला. रोज कुठेना कुठेतरी अश्या घटना घडत आहेत हिंदू धर्मातील लेकी सुरक्षित राहण्यासाठी हिंदू समाजाची एकजूट असणे गरजेचे असल्याचे हिंदू धर्मरक्षण मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव एकवटला होता.मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षा तसेच धर्मांतर विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात आली.

राज्यासह देशात धर्मांतरण कायदा आणावा लव जिहाद विरोधी सरकारने कडक पावले उचलावीत यासाठी परळी येथे आज सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी एक महिन्यापासून तयारी सुरू होती सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकात हिंदू बांधव जमायला सुरुवात झाले मोर्चाला पाठिंबा म्हणून परळीतील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय कडेकोट बंद ठेवत या महामोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवला. सकाळी दहाच्या दरम्यान निघालेला विराट हिंदू मोर्चा राणी लक्ष्मीबाई टावर – बाजार समिती – अग्रवाल लॉज – स्टेशन रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक – जलालपूर रोड – विद्यानगर परिसर मार्गे तहसील परिसरात मोर्चा धडकला.

या मोर्चासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसून आले. हातात विविध फलक घेऊन हिंदूंनी आपला रोष व्यक्त केला. प्रारंभी टॉवर परिसरात भारत माता,राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी हातात पवित्र भगवा ध्वज घेत केले.तहसील प्रांगणात श्रावणी साबणे या युवतीने व दीपा बंग यांनी लव्ह जिहाद या विषयावर मार्गदर्शन केले.महिलांच्या कपाळावरील टिकली म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे प्रतिपादन बंग यांनी केले.

Thursday, December 29, 2022

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित महानंद दूध महासंघाच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड.

*महानंदच्या १७ संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे.

कडा (कांतीकारी साथी न्युज) : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित अर्थात महानंदच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्या आ. सुरेश धस यांच्या पत्नी आहेत. 

महानंदच्या १७ संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, महिला राखीव मतदारसंघाच्या दोन जागांसाठी केवळ दोनच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. यामुळे संचालकपदी आष्टी तालुका सहकारी दुध संघाच्या संचालिका प्राजक्ता सुरेश धस व कात्रज दुध संघाच्या चेअरमन केशरबाई सदाशिव पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष भाजपचे जेष्ठ नेते आ.हरिभाऊ बागडे, विरोधीपक्ष नेते अजित पवार, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या प्रयत्नाने ही निवडणूक बिनविरोध झाली. प्राजक्ता धस यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.

धक्कादायक घटना ! वृद्ध महिलेवर नराधमाने लैंगिक अत्याचार करून केली बेदम मारहाण. आरोपीस अटक.



गेवराई (कांतीकारी साथी न्युज) : शहरातील मुख्यरस्त्याच्या बाजूला ७७ वर्षीय वृद्ध महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. आरोपीने मारहाण केल्याने पीडिता गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.  औरंगाबादकडे जाणाऱ्या मुख्यरस्त्यावर एक ७० वर्षीय वृद्ध महिला फळविक्रीकरून उदरनिर्वाह करते. तसेच रस्त्याच्या बाजूलाच आडोस्यात ती राहते. याच संधीचा फायदा घेऊन आज पहाटे ३ वाजेच्या दरम्यान एका नराधमाने वृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार केला. तसेच आरोपीने पिडीतेला जबर मारहाण केली. पिडीतेने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी तिकडे धाव घेतली. अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाला. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना याची माहिती देत पिडीतेला गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  
आरोपी ताब्यातदरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या बाजूच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर लक्ष्मण घुंगार्डे ( ३१, घुंगार्डे गल्ली,गेवराई)  असे आरोपीचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर यांनी पाहणी केली.

प्रशासकीय चौकटीत काम करत भविष्यात देखील कालानुरुप निर्णय घेऊ. - डॉ. ज्योती मेटे.


* देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आम्हा सर्वांना नवीन उर्जा व बळ देणारी, उमेद वाढविणारी ठरेल. 

शनिवारी (ता. ३१) अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती फेरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री अतुल सावे आदींची उपस्थिती असेल.याची माहिती देण्यासाठी गुरुवारी (ता. २९) डॉ. ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ज्योती मेटे म्हणाल्या, दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांनी कायम व्यसनमुक्ती  साठी पुढाकार घेतला. दरवर्षी ३१ डिसेंबरला व्यसनमुक्तीच्या प्रचारासाठी भव्य जनजागृती फेरी व संगीत रजनीचे कार्यक्रम होत. त्यांच्या पश्चात ही चळवळ पुढे सुरु ठेवत यंदाही शनिवारी शहरात सकाळी जनजागृती फेरी व सायंकाळी स्वर सुमनांजली कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आम्हा सर्वांना नवीन उर्जा व बळ देणारी, उमेद वाढविणारी ठरेल.

आपण आज दिवंगत मेटेंची व्यवसमुक्तीची चळवळ पुढे नेत आहात पण दिवंगत मेटे यांनी कायम सामाजिक चळवळीला राजकीय बळ दिले. अनेक प्रश्न त्यांनी राजकीय व्यासपीठावरुन मांडले व सोडवणूक केले. आपण त्यांचे अधुरे स्वप्न पुर्णत्वासाठी वेगळी भूमिका घेणार का?

या प्रश्नावर त्या म्हणाल्या, दिवंगत मेटे यांचे राज्यभरात विस्तारीत कुटूंब असून ते एकसंघ आहे. तयांच्या पश्चात आपण आपल्या प्रशासकीय चौकटीत राहून प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होत आहोत. आज प्रशासकीय चौकटीत काम करत असूनन भविष्यात देखील कालानुरुप व चौकटीत राहून निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोस्ट ऑफिस मध्ये नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगाराची फसवणूक,, तिघांना ताब्यात घेतले..


पोंभूर्णा  (प्रतिनिधी) बेरोजगार युवकांच्या असाह्यतेचा फायदा घेत भारतीय डाक विभागात नौकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन बेरोजगार युवकांची फसवणूक केल्या प्रकरणी अरविंद जनार्दन किन्हेकार रा.कोरंबी ता.मुल यांच्या तक्रारीवरून पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे तिन ठगबाजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून सदर फसवणूक प्रकरणात आणखीन मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्पर्धा परिक्षेची तयारी व शासकीय नौकरीसाठी प्रयत्न करीत असलेला अरविंद हा १० नोव्हेंबरला चंद्रपूर बस स्टॉप येथे बसून असतांना एक इसम त्याला भेटून पोस्ट आफिसमध्ये नौकरी लावून देतो असल्याची बतावणी केली असता अरविंद यांनी घरच्यांशी चर्चा करून त्यांनी संबंधिताला फोन केले.
पोस्ट आफीस मध्ये पोस्टल असिस्टंट पदासाठी ८ लाख रूपयात डिल करण्यात आली. बोलल्याप्रमाणे ९ डिसेंबरला आरोपी अंकुश पवार,चौधरी मॅडम,साने मॅडम हे तिघेही पोंभूर्णा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जामतुकूम पोस्ट आफिसमध्ये आले. तक्रारदार अरविंद किन्हेकार व गडचिरोली जिल्ह्यातील माल्लेर चेक येथील हर्षद शेट्टे यांना आरोपींनी जामतुकूम पोस्ट आफिसमध्ये बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले.सोबतच थंब मशीनही देण्यात आले.
यावेळी आरोपींनी अरविंद किन्हेकार व हर्षद शेट्टे यांचेकडून प्रत्येकी २५ हजार रुपये टोकन अमाऊंट घेतले. सदर दोघांनी कामही सुरू केले मात्र पोस्ट आफिस इन्स्पेक्टर मनिष ठवकर हे जामतुकूम येथेसता यासारखी कोणतीही नियुक्ती न झाल्याचे सांगताच फसवणूक झालेल्या किन्हेकार व शेट्टे यांनी तिघांविरुद्ध पसवणूकीची तक्रार दाखल केली.
या प्रकरणी तिघांविरुद्ध कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी करीत आहेत.

कोंबडीचे पाय का तोडले म्हणून धारदार शस्त्राने वार; मटण शॉपमधील घटना.


*मटण दुकानात दोघांत झालेल्या वादात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात धारधार शस्त्र मारले. या घटनेची पोलिसांकडे नोंद झाली नसली तरी संपूर्ण गावात आणि तालुक्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.

केज (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून वाद होण्याच्या घटना वाढत आहेत. नेमक्या कोणत्या कारणावरून कोणात कसा वाद होईल आणि त्यातून मारहाण आणि खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात अशी एक घटना घडली असून किरकोळ कारणावरून चक्क धारधार शस्त्र डोक्यातच मारून युवकाला गंभीर जखमी करण्यात आले. ज्या कारणामुळे ही घटना घडली ती वाचून तुम्हाला देखील हसू येईल.
जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथे दोन युवक (दिगंबर राऊत आणि अशोक राऊत) मटण शॉपवर मटण घेण्यासाठी आले होते. दिगंबर आणि अशोक जेव्हा मटण दुकानात पोहोचले तेव्हा दुकानात कोणी नव्हेत. अशोक याने स्वत:हून दुकानातील कोंबडीचे पाय कापण्यास सुरूवात केली. हा प्रकार पाहून दिगंबरने त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात या दोघांमध्ये वाद आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत अशोकने चक्क दिगंबरच्या डोक्यात मटण कापण्यासाठीचे धारधार शस्त्र मारले. या हल्ल्यात दिगंबर राऊत गंभीर जखमी झाला. 

हा सर्व प्रकार सुरू असताना आसपास उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिगंबरला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दोघांमधील वाद हा भावकीतील असल्याने यावर कोणी बोलण्यास तयार नाही. या प्रकरणी पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र कोंबडीच्या पायावरून झालेल्या वादाची गावात आणि संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे. वाद का झाला तर कोंबडीच्या पायामुळे झाला अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान दिगंबर राऊत हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. 

ज्वारीच्या शेतात नेऊन 40 वर्षीय महिलेवर बलात्कार.


नेकनूर (प्रतिनिधी) चाळीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगव्हाण येथे मंगळवारी घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विकास श्रीरंग खंदारे असं आरोपीचे नाव आहे. मंगळवारी आरोपीने पीडित महिलेला ज्वारीच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच घडलेली घटना कोणालाही सांगू नको अन्यथा जीवे मारण्यात येईल अशी धमकी देखील त्याने पिडीतेला दिली याप्रकरणी पिडित महिलेने रात्री नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी खंदारे याच्याविरोधात कलम 376, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकप्रमुख मिसळे हे करत आहेत.

2023 नववर्षाचे स्वागत व्यसनमुक्ती जनजागृती फेरी व स्वर सुमनांजली कार्यक्रमाने होणार.


*बीड शहरातून निघणार व्यसनमुक्तीची फेरी. 

बीड (प्रतिनिधी)  मद्यपान संसाराची धुळधाण, व्यसनाची गोडी अन् संसाराची राखरांगोळी, घ्याल तंबाखुची साथ, आयुष्य होईल बरबाद, अशा विविध घोषणा शनिवारी दि. ३१ डिसेंबर रोजी शहरात निघणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीमध्ये ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर रात्री रसिक प्रेक्षकांना व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत सांस्कृतिक स्वर सुमनांजली कार्यक्रमाचा लाभ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे घेता येणार आहे. अशी माहिती कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने देण्यात आली आहे.

घरातील एका व्यसनी व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुःख सहन करावे लागते. लोकांकडून होणाऱ्या कुचेष्टेला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत आपल्या कुटुंबातील कोणीही व्यसनाच्या आधीन जाऊ नये या उदात्त हेतूने शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आ. विनायकराव मेटे साहेब यांनी व्यसनमुक्ती साठी लढा उभा करून मोहीम राबवण्याचा चंग बांधला होता. व्यसनाधीनतेमुळे समाजाचे होणारे नुकसान आणि हानी टाळण्यासाठी त्यांनी व्यसनमुक्ती अभियान जिल्ह्यात सुरू केले, आज त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांनी घेतलेला वसा पुढील चालू ठेवण्यासाठी कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी देखील व्यसनमुक्ती जनजागृती महा रॅलीचे व स्वर सुमनांजली या कार्यक्रमांचे आयोजन दिनांक ३१ डिसेंबर रोजी शनिवार रोजी करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथून या जनजागृती फेरीला हिरवी झेंडा दाखवून सुरुवात होईल सुभाष रोड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या मार्गे फेरी सामाजिक न्याय विभागात पोहोचेल. शहरातील विविध शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह तरुण आणि नागरिक या फेरीत सहभागी होणार आहेत.

वन विभागातील दोन वनरक्षक व चालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


बीड (प्रतिनिधी) साॅ मील च्या मशीन चा परवाना नूतनीकरण करून कारवाई न करण्यासाठी पन्नास हजार रुपयाची लाच घेताना बीड वन विभागातील दोन वनरक्षक व चालकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

ही कारवाई जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.साॅमिल धारकाकडे वनविभागातील तिघांनी प्रत्येकी 5 हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरविले होते. सर्व साॅमिल धारकाकडून प्रत्येकी 2 हजार प्रमाणे 50 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. पडताळणी नंतर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जालना येथील एसीबीच्या टीमने सापळा लावून कुर्ला रोडवरील एका साॅमिलच्या ठिकाणी या वनरक्षक जाधव, वनरक्षक शेख अकबर, चालक भालेराव या तिघांना 50 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. दरम्यान तक्रारदाराने तक्रार दिलेल्या पैकी एक कर्मचारी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे बीडच्या वनविभागात खळबळ माजली आहे.

पत्रकार संघाच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर. तपासणीचा लाभ घ्या - वैभव स्वामी

 
 
बीड (प्रतिनिधी) रविवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. बीड शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर जाजू यांच्या भाजी मंडई येथील डोळ्याचा दवाखाना या हॉस्पिटलमध्ये पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्स्फूर्तपणे घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव विवेक स्वामी यांनी केले आहे.

Wednesday, December 28, 2022

उद्या परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत.  यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी 29 डिसेंबर रोजीज परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाजाचा  मुकमोर्चा गुरूवार दि 29 डिसेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून निघून तहसील कार्यालय परळी पर्यंत निघणार आहे.
 

या मोर्चास समस्त हिंदू बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे.

● *असा असेल मोर्चाचा मार्ग....*
   या मोर्चाची सुरूवात राणी लक्ष्मीबाई टॉवर ते बाजार समिती ते एकमिनार चौक ते बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवान बाबा चौक ते तहसील पर्यंत जाईल. प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चाचा समारोप होणार आहे.

डॉ.दिपा क्षीरसागर अलौकिक व्यक्तिमत्व. प्रशासक म्हणून लाभल्या हे बीडचे सौभाग्य :- माजी जिल्हाधिकारी डॉ.भारत सासणे


*सेवा गौरव समारंभ आणि साहित्य महोत्सवाचे शानदार उदघाटन संपन्न. 

बीड (प्रतिनिधी) अलौकिक व्यक्तिमत्व प्रशासक म्हणून लाभल्या हे बीडचे सौभाग्य आहे. शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात बीडकरांच्या इतिहासात नोंद राहील अशी कामगिरी डॉ दीपा क्षीरसागर यांनी केली. बीड जिल्ह्याचा कार्यकाळ अविस्मरणीय असा राहिला, बीड जिल्ह्याने त्याचे वेगळे पण कायम सिद्ध केले आहे बीडच्या इतिहासात दीपा ताईंच्या कर्तृत्वचा ठसा हा लक्ष्मी सरस्वतीच्या संगमाने लाभलेल्या आशीर्वादासम आहे. असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी जेष्ठ साहित्यिक डॉ.भारत सासणे यांनी केले. ते सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा सुप्रसिध्द् लेखिका डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या सेवागौरव व साहित्य महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर, न.शि.सं.राजुरी नवगणचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उत्सवमुर्ती प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, वृत्त निवेदक, कलाकार ज्योती आंबेकर , युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, काकू नाना, कवियत्री स्व सुहासिनी इर्लेकर व स्व यशवंतराव इर्लेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी दीपस्तंभ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उपप्राचार्य संजय पाटील म्हणाले की,डॉ. दीपाताई निवृत्त होऊ शकतात ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. डॉ दीपाताईंच्या सेवा निवृतीचा उत्सव व्हावा ही कॉलेजमधल्या प्रत्येकाची इच्छा होती आणि त्याना सरप्राईज देण्यासाठी त्याच्या नकळत हा सेवा गौरव समारंभ आयोजित केला असल्याचे उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर यांनी सांगितले .क्षीरसागर घराण्याची कर्तबगारपणा जोपसण्याचे कार्य दीपा ताईंनी केले, कर्तृत्वाने प्रगल्भ असतानाही प्रत्येक व्यक्तीला मनसन्मान देणे ही वृत्ती ताईंच्या अंगी आहे, महाविद्यालयच्या प्राचार्य दीपाताई असणे म्हणजे सुरक्षितेची भावना मुलींच्या मनात तयार होते , ताईंबद्दल खुप काही आठवणी आहेत प्रत्येक गोष्टीतून त्याच्यातील ऋजुता ओझरते असे मत वृत्त निवेदक, कलाकार ज्योती आंबेकर यांनी व्यक्त केले.

तर बीडच्या संस्कृतीक वैभवात भर टाकण्याचे काम दीपा ताईंनी केले असे मत अभिनेते डॉ.राजु पाटोदकर यांनी व्यक्त केले, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ दीपाताईंच्या सहवासात काम करताना प्रशासक हा दीपा ताईंसारखा असावा असे मत प्रा. सत्येनंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

दीपाताईनं सारखा प्रशासक असेल तर उत्तम प्रशासक तयार होईल, ताईंच्या मार्गदर्शनाने देशातील उत्तमोत्तम क्षेत्रात महाविद्यालयाचे विद्यार्थी आज आहेत असे मत उप प्राचार्य सय्यद लाल यांनी व्यक्त केले. प्रकृती अस्वस्त्यामुळे मला यायला जमलं नाही मात्र घरच्यां कार्यक्रमात मला हक्काने बोलविले यातच बीडच्या मायेची ओल जाणवते. दीपाईच्या बद्दल बोलताना त्याच्या ठायी असलेल्या माणुसकी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वचे दर्शन होते, चौफरे भरारी घेऊन ही जमिनीवर पाय असणारे व्यक्तिमत्व म्हणजे दीपाताई शिरसागर असे व्हिडीओ द्वारे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
ज्योती अंबेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बहुचर्चित नरहर कुरूंदकर प्रस्तृत एका विचारवंताची अपरिचित गोष्ट या साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले, या अभिवाचनाला अजय आंबेकर, ज्योती आंबेकर, दिलीप पाध्ये, विश्वास आंबेकर

ज्योती पाध्ये, शुभंकर देशपांडे यांच्या सह मुंबई आणि मराठवाड्यातील प्रतिथयश कलावंत आणि तंत्रज्ञ लक्ष्मीकांत दोडके, सतीश मस्के, ईश्वर मचकटकर, शेख अमजद हे लाभले. आभार प्रदर्शन प्रभारी प्राचार्य शिवानंद क्षीरसागर तर सूत्रसंचालन अभिनेत्री डॉ उज्वला वणवे यांनी केले.
कार्यक्रमास क्षीरसागर कुटुंबातील सर्व सदस्य, महाविद्यालयातील तसेच संस्थेतील सदस्य, शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी होजागिरी हे सांस्कृतिक नृत्य सादर झाले, जेष्ठ साहित्यिक विद्यासागर पाटांगणकर, सेवा गौरव समितीचे सदस्य राजेंद्र मुनोत, संपादक दिलीप खिस्ती, प्रभारी प्राचार्य शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर, उप प्राचार्य सय्यद लाल, प्राचार्य डॉ. राजपांगे, प्राचार्य आबासाहेब हांगे, उप प्राचार्य विलास भिल्लारे, प्रा.सतीश माउलगे, प्रा. विश्वास कंधारे, प्राचार्य काळे, प्रा.जालिंदर कोळेकर यांच्या सह शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेक कस्टमर केअर नंबरचा डॉक्टरला फटका; सायबर भामट्यांनी 'एनीडेस्क'ने बँकखाते केले रिकामे.


*पार्सल रिटर्न करण्यासाठी गुगलवरून मिळवला होता कस्टमर केअर नंबर. 


माजलगाव (कांतीकारी साथी न्युज)  फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपनीकडून आलेले पार्सल परत करण्यासाठी गुगलवर कंपनीचा कस्टमर केयर नंबर सर्च करणे एका डॉक्टरांना चांगलेच महागात पडले. संबंधीत डॉक्टरांनी गुगल सर्च करून एक मोबाईल नंबर मिळवला. मात्र त्या मोबाईलवरून बोलणार्‍या भामट्याने त्यांना एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले. हे अ‍ॅप डाऊनलोड करताच डॉक्टरांच्या खात्यातील 75 हजाराची रक्कम सायबर भामट्यांनी पळवली. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
डॉ.शामसुंदर दगडूराम काकाणी (रा.समता कॉलनी माजलगाव) असे फसवणूक झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. फ्लिपकार्टवर त्यांनी एक पार्सल मागवले होते. मात्र ते पार्सल त्यांना परत करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च करून फ्लिपकार्ट कस्टमर केयरचा नंबर शोधला. तेथे त्यांना इंडिया कस्टमर केयर असा उल्लेख आढळला. तसेच त्याठिकाणी कॉल नॉउ असा उल्लेख असल्याने त्यावर त्यांनी क्लिक केले असता एक नंबर स्क्रिनवर दिसला. डॉ. काकाणी यांनी त्या नंबरशी संपर्क केला असता समोरून बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले. 

.त्याच्यावर विश्वास ठेवत डॉ.काकाणी यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड केले अन इथेच त्यांची फसवणूक झाली. पार्सल तर परत पाठवता आलेच नाही मात्र सायबर भामट्याने खात्यातील 75 हजार रुपय पळवून डॉक्टरला चुना लावला . याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात डॉ.काकाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे पुढील तपास करत आहेत.

आष्टी, शिरूर परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.


*इतर जिल्ह्यातील गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

आष्टी (कांतीकारी साथी न्युज) : आष्टी व शिरूर कासार भागात घरफोडी करणारी टोळी अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या टोळीच्या म्होरक्याच्या स्थानिक गुन्हेशाखेने मंगळवारी मुसक्या आवळल्या. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी शहरातील मुर्शदपूर भागात दिनांक 17/12/2022 रोजी रात्री 02.45 वाजेच्या सुमारास फिर्यादी अविनाश नानासाहेब पवळ वय 42 वर्षे व्यवसाय डॉक्टर (रा. मुर्शदपुर ता.आष्टी) हे घरामध्ये झोपलेले असताना दरवाजाची कडीकोंडा तोडून अनोळखी चार चोरटयानी घरामध्ये प्रवेश करुन काठीचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम चोरी करुन घेऊन गेले. 

या फिर्यादवरून पो.स्टे. आष्टी गुरनं 414/2022 क. 392,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरची बाब गंभीरतेने घेवून मा.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. सदर गुन्हयाचे अनुषंगाने पो.नि.स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथकाने घटनास्थळी पाहणी करत तपास सुरु केला. 

आरोपी व मालाचा शोध घेत असतांना मा.पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निबांळकर आसाराम भोसलेने ( रा.चिंचोडी पाटील ता.जि.अहमदनगर)  साथीदारासह चोरी केली आहे. यावरून मंगळवारी पोलिसांनी चिचोडी पाटील येथून  निबांळकर आसाराम भोसलेस ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तीन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच पोलीस ठाणे शिरुर हद्दीमध्ये २ महिन्यांपूर्वी मानुर शिवारात सिध्देश्वर वस्तीवर व सिरसाट वस्तीवर मारहाण करुन चोरी केल्याची कबुली दिली. 

आरोपींकडून इतर जिल्हयातील गुन्हे देखील उघडकिस येण्याची शक्यता आहे.  पुढील तपास पो.स्टे. आष्टी व स्था.गु.शा.चे पथक करीत आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक सतिष वाघ, पोउपनि भगतसिंग दुलत, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, रामदास तादंळे, पोना-सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, विकी सुरवसे, अशोक कदम यांनी केली. 

गायरान जमिनिच्या विषयावर लवकर भुमिका स्पष्ट करण्याची मागणी.अन्यथा मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू. ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा.



नागपूर : रेव्येनू कायद्यान्वये जो व्यक्ती सतत १२ वर्षे एखाद्या जागेवर स्थायीक राहत असेल तर तो त्या जमीनीचा कायदेशीर मालक बनतो. परंतू या कायद्याचा विसर स्वतः माननीय कोर्टालाच पडला असल्याची घणाघाती टिका आज वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपूर येथे विधानभवनावर काढण्यात आलेल्या 'इशारा मोर्चा' मधे ते बोलत होते. 

महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने परिवार हे मागील ४०-५० वर्षांपासून गायरान जमिनिवर अतिक्रमण करून वास्तव्य करत आहेत. परंतू कोर्टाच्या एका निर्ययामुळे त्यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आलेली आहे. व या सर्वांमधे महाराष्ट्र शासन हे निव्वळ बघ्याची भुमिका घेत असून स्वतःला सामान्य कुटूंबातील सांगणाऱ्या मुख्यमत्र्यांनी जर लवकरात लवकर भुमिका घेऊन गायरान जमीनीचा प्रश्न सोडवला नाही तर, रस्ता व आमचं नातं खुप जूनं आहे तेव्हा आम्ही मुख्यामत्र्यांचा रस्ता थांबवू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 
चंद्रकांत पाटील यांनी महापूरूषांबद्दल जे काही विधान केले त्यामधे काहीही नाविन्य नसून ती संघाची खुप अगोदरची मानसिकता आहे, चंद्रकांत पाटील यांनी यामधे संघाच्या संस्थांचे नाव न घेत त्या खोके संस्कृतीतून निर्माण झाल्याची कबूलिच दिली त्याकरिता चंद्रकांत पाटील यांच्या जाहिर सत्कार करायला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर बोलले. 

वंचित बहुजन आघाडी तर्फे इशारा मोर्चा चे आयोजन आज करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर, अशोक सोनोने, अरूंधती शिरसाठ, अशोक हिंगे पाटील, सविता मुंडे, डॉ निशा शेंडे,
विलास वटकर, संगिता गोधनकर, शमिभा पाटील, अमित भुईगळ, डॉ रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, राजू लोखंडे, विश्रांती रामटेके, रवी शेंडे, मुरली मेश्राम, अरविंद सांदेकर, इत्यादि पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

Tuesday, December 27, 2022

Board exam 2022 दहावीच्या परीक्षा रद्द नवीन शासन निर्णय आला.


Board exam 2022 तर 10 व्या वर्गात शिक्षण घेत असणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा बोर्ड मध्ये होणार नाही. तसेच पदवी 4 वर्षांनंतर केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग 11 वी राहणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार नाही.10 वी च्या वर्गाची बोर्डची परीक्षा रद्द करून 11 वी ची बोर्डची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती. परंतू त्या मध्ये नवीन बदल करून 12 वी ची परीक्षा बोर्ड मध्ये होणार आहे.

त्यामध्ये माध्यमिक कडून 8 वी वर्ग काढून ती प्राथमिकला 10 वी ऐवजी आता 12वी बोर्ड असणार आहे.माध्यमिकचा टप्प्या 9 ते 11 राहणार आहे.नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. 21व्या शतकातील हे पहिले पाउल आहे.1986ला राबविलेले शैक्षणिक धोरण 34 वर्ष कार्यरत होते.त्यामध्ये आता पुढील शैक्षणिक वर्षापासुन बदल करण्यात येत आहे.

या धोरणामध्ये सर्वांना संधी,दर्जात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार शिक्षण असे 3 स्तंभ यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. 2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी यांचा संवाद होणार आहे.शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्पक शिक्षण केंद्रे उभी केली जाणार आहेत. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण अशा दोन्ही पातळींचा अवलंब यामध्ये आहे.

Board exa m 2022भारतात जवळपास २ कोटी मुले शाळाबाह्य आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे. ५+३+३+४ असा एकूण १५ वर्षांचा अभ्यासक्रम आहे.या नव्या शैक्षणिक धोरणात बोर्ड परीक्षा कुठली, हा प्रश्न अनेक दिवस अनुत्तरित आहे.मात्र, नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आता अकरावी बोर्ड करावे लागणार असताना, बारावी बोर्डाची परीक्षा जाहीर झाली आहे.

दीड महिन्यांचा बाळाला मुदत संपलेला डोस पाजला.डॉ.शरद पवारसह एका नर्सवर गुन्हा.


*राजकीय दबाव आणल्याने अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.

माजलगाव (कांतीकारी साथी न्युज)  येथील पवार हॉस्पीटलमध्ये दीड महिन्याच्या बालकास मुदत संपलेला डोस पाजण्यात आला होता. राजकीय दबापोटी अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी व पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळता करत होते. याप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर डॉ. शरद पवार व एका नर्सवर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील पवार हॉटेलमध्ये 7 नोव्हेंबर रोजी शितल आनंद राऊत यांच्या दीड महिन्याच्या मुलीला आठ महिन्यापूर्वी मुदत संपलेला डोस पाजण्यात आला होता. या विरोधात बाळाचे आजोबा अशोक धारक यांनी पवार हॉस्पिटल विरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने चौकशी केली. डॉ. पवार यांनी राजकीय दबाव आणल्याने अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.

याप्रकरणी लोकमतने डॉ. पवारला वाचवणारे संबंधीत विभागाचे अधिकारी व पोलीसांविरोधात आवाज उठवल्यानंतर सोमवारी संध्याकाळी डॉ. शरद पवार व लस देणाऱ्या नर्स सोनाली चंद्रशेन गोरे यांच्याविरुद्ध अन्न व औषधी प्रशासनाचे औषधी निरीक्षक विलास दुसाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हॉस्पिटलमध्ये लसीचा औषधसाठा नोंदवही ठेवण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर लशिबाबतचे रेकॉर्ड ठेवण्यात आलेले नाहीत. यासह अनेक त्रुटी संबंधित तपास अधिकाऱ्यांना आढळून आल्या होत्या.

जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाचा पेपर. विद्यापीठाच्या परीक्षेत उडाला गोंधळ.

पदव्युत्तर (पीजी) परीक्षेमध्ये नागसेन वन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ यादरम्यान एम. ए. इंग्रजीचा जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर होता; परंतु चुकीचा पेपर देण्याचा प्रकार झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. एमए इंग्रजीच्या प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्राचा पेपर होता. ‘लिटरेचर इन इंग्लिश’ हा पेपर होता. सकाळी साडेनऊ वाजता परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून परीक्षा केंद्रावर पेपर पाठवण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात पेपर वितरित केल्यानंतर हा तर नव्या अभ्यासक्रमाचा पेपर आल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यानंतर केंद्रप्रमुखांनी परीक्षा विभागाला कळवले. त्यांनतर लगेच दुसरा, म्हणजेच जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर उपलब्ध करून देण्यात आला. ८० गुणांची हा पेपर होता. जवळपास २०२ विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. 

तत्काळ दुसरा पेपर.

संबंधित परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर तत्काळ दुसरा पेपर बदलून देण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी सांगितले.

अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात चालक फरार.


केज (कांतीकारी साथी न्युज) अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यास धडक दिली. अपघात होताच कारचा चालक गुटखा भरलेली कार जागीच सोडून पळून गेल्याची घटना धारूर केज रोडवरील साने गुरुजी विद्यालयाजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज-धारूर रोडवरील साने गुरुजी विद्यालयाजवळ कार क्र. एम एच-12 न ब-3262 ने रस्त्याने पायी जात असलेल्या काशिनाथ राऊत वय 40 वर्ष यास धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्या नंतर ही कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. अपघात होताच कार चालक कार सोडून पळून गेला.
या अपघाताची मिळताच पोलीस नाईक उमेश आघाव, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी जखमी काशिनाथ राऊत पेंटर यास रुग्णालयात दाखल करत कारची तपासणी केली. यावेळी, कारमधून राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूची बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. कारमध्ये लाल रंगाचे रॉयल 220 तंबाखुचे 102 पुडे, केशरयुक्त हिरा का बाबाजी पान मसालाचे 102 पुडे असा एकूण 1 लाख 19 हजार 340 रुपयांच्या गुटख्याच्या 6 गोण्या व 2 लाख रुपये किंमतीची कार असा 3 लाख 25 हजार 970 रुपयांचा माल जप्त केला. जमादार उमेश आघाव यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत.

Monday, December 26, 2022

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्याकडून अधिकार्‍यांना 15 कोटी वसुलीचे टार्गेट.! विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी तर हायकोर्टाकडूनही ताशेरे.


नागपूर (प्रतिनिधी)  नागपूर जमीन घोटळ्यावरून राज्याच्या हिवाळी अधिवेशानाचा पहिला आठवडा संपला असता; अधिवेशनातील दुसरा आठवडाही वादळी ठरतांना दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सरकार आणि विरोधक यांच्यात प्रचंड सामना पाहायला मिळाला. तर अनेक आरोप/प्रत्यारोप देखील करण्यात आले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत; गंभीर आरोप केले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

 विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप.! 

कृषी मंत्रालयाकडून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांचे टार्गेट दिले असून, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात होणाऱ्या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना या महोत्सवासाठी १५ कोटीचे टार्गेट दिल्याची माहिती आज विधानसभेत विरोधकांकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, "सिल्लोड महोत्सवासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या रक्कमेचे कूपन काढले आहेत. ते कूपन विकण्याचे किंवा खपवण्याचे काम राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलं आहे. १० पेक्षा जास्त तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे आणि १० पेक्षा कमी तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे टार्गेट देण्यात आलंय. कूपनमध्येही वेगवेगळ्या कॅटॅगरी आहेत. कृषी दुकानांकडूनही काही बेकायदेशीर रक्कमेची मागणी होत आहे. हे लोकशाहीला धक्का देणारं कृत्य आहे. हे सगळ्या नियमांची पायमल्ली करत असतात. त्यामुळे आम्ही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत" असं विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत. 

नागपूर खंडपीठाने अब्दुल सत्तार महसुल राज्यमंत्री असतांना केलेल्या गायरान जमीन वाटपावर देखील नाराजी व्यक्त करत त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यावर देखील अजित पवार यांनी काही मुद्दे उपस्थितीत केले. नागपूर खंडपीठाने आताच्या कृषीमंत्र्यांविरोधात ताशेरे ओढले आहेत. पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. २९ गुंठे गायरान जमीन वाटपात १५० कोटींचा घोटाळा झाल्याचे कोर्टाने निरीक्षण नोंदवले आहे असं अजित पवार म्हणाले. तर सत्तार यांच्यावर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढत.! सत्तार यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत.

धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला; बीडमध्ये ढोल वाजवत मोर्चा.

बीड : (कांतीकारी साथी न्युज)  धनगर आरक्षणासाठी सरकार केवळ अश्वासने देत आहेत. परंतू ठोस भूमिका घेतली जात नाही. याच अनुषंगाने समाज बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांना घेऊन यशवंत सेना आक्रमक झाली होती. ढोल, झांज वाजवत समाज बांधवांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवू, असा इशारा धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी दिला. यावेळी खा.गावीत यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.

आतापर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेना व इतर संघटनांनी अनेकदा मोर्चे काढले. आंदोलने केली. वेगवेळे अनोखे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले. असे असतानाही सरकारने केवळ अश्वासने दिली. भाजप सरकारने अश्वासने दिल्यानंतर सत्ता गेली. नंतर विरोधात गेल्यावर सध्याचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यावर आरक्षण देऊ असे अश्वासन बारामती येथील सभेत दिले होते. आता भाजप-शिंदे सरकार आले आहे. यात अनेक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत. परंतू आरक्षणाबाबत कोणीच बोलत नाही. खा.सुप्रिया सुळे यांनी याबाबत आवाज उठवताच खा.गावीत यांनी याला विरोध केला. त्यामुळे गावीत यांच्याविरोधातही समाजामध्ये प्रचंड रोष आहे. गावीत यांचा निषेध करण्यासह धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, आरक्षण मिळेपर्यंत ज्या २२ योजना लागू करण्यात आलेल्या आहेत, त्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची भरीव तरतूद करावी, तसेच याला चालू अधिवेशनात मंजूरी घ्यावी, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. भारत सोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात गणेश सातपुते, कैलास निर्मळ, रामनाथ यमगर, उमेश निर्मळ, साईनाथ कैतके यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*सहनशिलतेचा अंत पाहू नका - सोन्नर

मागील अनेक वर्षांपासून सामाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेना लढा देत आहे. अनेकदा अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. आताचे सत्तेतील मंत्री हे विरोधात असताना सत्ता आल्यावर आरक्षण देऊ, असे अश्वासन देतात. परंतू सत्ता आल्यावर त्यांना याचा विसर पडतो. आता धनगर समाजाची फसवणूक असून समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी मोर्चातून दिला आहे.

दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर करू भगतसिंगगिरी : डॉ. संतोष मुंडे.



*डॉ.संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली 5 ते 6 हजारपेक्षा जास्त लोकांचे विराट आंदोलन. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दिव्यांग, विधवा, परित्यक्ता  ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशा घटकांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर सोमवार, २६ डिसेंबर रोजी दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या नेतृवाखाली आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली पाच ते सहा हजारपेक्षा अधिक नागरिकांनी विराट आंदोलन केले. 
        याप्रसंगी बोलताना दिव्यांग, विधवा, परित्यक्ता  ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर भगतसिंगगिरी करू असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ. संतोष मुंडे यांनी केले. आंदोलनातील विविध मागण्या पुढीलप्रमाणेवरील;  १. वरील सर्वांना अंत्यादोयामध्ये (2 रू. प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ) समावेश करून घ्यावा.  २. तहसीलद्वारे या घटकांना देण्यात येणाऱ्या पगारी नियमित करणे तसेच त्यात कमी जास्त न करणे. ३. वरील घटकांना सरसकट घरकुल देण्यात यावे. ४. नगर परिषद, ग्रामपंचायत,  पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा वरील घटकांसाठी राखीव असलेला ५% निधी  नियमित वाटप करावा. ५. दिव्यांगांना यु पी आय डी कार्ड घरपोच देण्यात यावे. ६. रेशन कार्ड ऑनलाइन करून देणे व फाटलेल्या रेशन कार्ड बदलून देणे. या अंदोलनात दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
      दिव्यांग, विधवा, परित्यक्ता  ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध प्रश्नांसाठी डॉ. संतोष मुंडेंनी आयोजित केलेल्या मागण्या बाबत तहसील प्रशासनाने चर्चे दरम्यान सकारात्मक प्रतिसाद देत जागीच मागण्या मान्य केल्या. तहसील प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी निवेदन स्वीकारले. डॉ संतोष मुंडे ज्या ज्यावेळी अंध,अपंग, निराधार, परित्यक्ता महिलांच्या समस्या मांडतात, त्या समस्या आम्ही तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करतो,त्याला सकारात्मक प्रतिसाद देतो, इथून पुढे ही या सर्व समस्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करु. असे सांगितले आहे. तहसील येथील भव्य अंदोलनास बाळासाहेब देशमुख, जानेमिया कुरेशी, सोफिया नंबरदार, के डी उपाडे, दत्ता सावंत, सचिन मुंडे, शंकर कापसे सय्यद सिराज, मनजीत सुगरे, नागनाथ मुंडे, विठ्ठल साखरे, देवानंद दहिफळे आदीनी अंदोलनास भेटी देऊन पाठींबा दिला. यावेळी डॉ.संतोष मुंडे यांच्यासह साजन लोहिया, सय्यद सुभान, संतोष आघाव, नागनाथ सावजी, विलास काळूंखे, अशोक सोनवणे, रंगनाथ तोंडे, शेख फेरोज, अनंतराव लोखडे, अशोक गंडले, अनंत बापु मुंडे, उध्दव फड, माणिक जाधव, संजय नखाते, संदेश कापसे, लतीफ कुरेशी, विष्णू अरसुळे, विष्णू शेप, विलास रुद्रवार, नागरगोजे आशा, सरताज खान, विष्णू आघाव, शिवाजी चाटे, नानासाहेब मुंडे, शेख रहिम, आसेफ खान, निलाबाई भद्रे, पुष्पा कांबळे,दत्ता कराड, दिलीप भेंडेकर, अल्लाउद्दीन शेख,  सुधाकर फड, जीवन सातभाई, केशव फड, रंजित रायभोळे, नंदकुमार जोशी, प्रदिप भोकरे, शेख सिंकदर, रामेश्वर जाधव, मनोज नाथानी, राम वलवार, विमल धुमाळ, अरिहंत लोढा, विमल निलंगे, दत्ता काटे, अविनाश फड, धनश्री वेताळ, शेख मिया, संतोष बल्लाळ, अभिजीत जगतकर, चंद्रकात होलबोले, महादेव राऊत, बालाजी शहाणे,  सर्जेराव कुभार, दिगंबर सरवदे, प्रमोद आबाळे ,  कपिल जाजू, तुळशिराम प्रयाग,  महेबुब पठाण, योगीराज दुर्गे, विशाल चव्हाण, सुरेश माने,शिवाजी माने, शेख हबीबभाई, शेख मुबारक, विजय भोयटे, गोपाल बाराड, पठाण आसेफखान, शेख जावेद, खान युनूस, सुनीता कवले, उषा आघाव,  विमल निलगे, ममता बद्दर, उत्तरेश्वर सोळंके, राजकुमार प्रधान, राम भोळे, दगडू भाले, शेख खडूस, कराड पार्वती, अमोल गोलहार, मयूर शिंदे, सदाशिव शिदे, दीपक पारधे, सोमनाथ गित्ते, शेषराव गित्ते व दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, आणि माजी सैनिक संघटना आदी उपस्थित होते.

जीप- दुचाकीची समोरासमोर धडक; एका मुलाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी.

*जखमी दोघांवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कडा (कांतीकारी साथी न्युज) : 
दळण घेऊन मित्रांसोबत घराकडे निघालेल्या दुचाकीवरील तीन मुलांना जीपने जोरदार धडक दिली. यात एका मुलाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहेत. विनोद राजेश शिंदे ( १४ वर्ष रा. तिर्थपुरी जि.जालना ) असे मृत मुलाचे नाव आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नगर- बीड महामार्गावर झाला. 
आष्टी तालुक्यातील कडा येथून जाणाऱ्या  नगर- बीड राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला झोपड्यात एक कुटुंब राहते. हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी जालना जिल्ह्यातून दोन वर्षापुर्वी येथे आलेले आहे. दिवसभर मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. रविवारी सायंकाळी कडा येथील एका पिठाच्या गिरणीवरून विनोद राजेश शिंदे हा अर्जुन राजू शिंदे ( १६ रा.जालना) आणि सुरज राजू पवार ( १४ रा.जालना ) यांच्यासोबत घराकडे दुचाकीवरून ( क्र. एम.एच १४, डी.झेड. २६७०) निघाला. दरम्यान, अहमदनगरवरून आष्टीकडे जात असलेल्या जीपने ( एम. एच २४ व्ही.६२६०) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात विनोदचा जागीच मृत्यू झाला.
तर अर्जुन राजू शिंदे आणि सुरज राजू पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शोकाकुल वातावरणात मयत मुलावर कडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जुन शिंदेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अभियंता लाच घेताना पकडले.


परळी वैजनाथ : राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारणार्‍या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील येथील उपकार्यकारी अभियंत्यावर बीड एसीबीने सोमवारी (दि.26) दुपारी कारवाई केली. सदरील उपअभियंत्यासह खाजगी व्यक्तीवर लाचखोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अनिल रामदास वाघ (वय 36, उपकार्यकारी अभियंता, परळी थर्मल पॉवर स्टेशन) व खाजगी इसम आदिनाथ आश्रुबा खाडे (वय 36 रा. शिवाजी नगर, परळी जि. बीड) अशी लाचखोरांचे नाव आहे. परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील तक्रारदाराला औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतुकीसाठी 20 गेटपास देण्यासाठी अनिल वाघ याने प्रत्येकी प्रती गेटपास 4 हजार रूपये प्रमाणे एकूण 80 हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम आदिनाथ खाडे या खाजगी व्यक्तीकडे देण्यास सांगितली. सदर तक्रारीवरून बीड एसीबीने सापळा रचून 80 हजार रुपये स्वीकारताना आदिनाथ खाडे याला रंगेहाथ पकडले. हि कारवाई बीड एसीबीने केली.

नव्या संसद भवनाला ' अनुभव मंटप अथवा बसवमंटप ' नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी.पंतप्रधानांना निवेदने पाठवावे - आत्मलिंग शेटे

 
           
परळी वैजनाथ (प्रतिनिधी). जगातील पहिल्या लोकशाही संसदेची मुहूर्तमेढ क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी केली. म्हणून दिल्लीत नव्याने निर्माण केलेल्या संसद भवनाला " अनुभव मंटप अथवा बसवमंटप " असे नामकरण करण्यात यावे,अशी मागणी देशातील सर्व समाजबांधवांनी आणि संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी असे आवाहन बीड जिल्हा लिगांयत संघर्ष समितीचे समन्वयक तथा पत्रकार आत्मलिंग शेटे  यांनी केले आहे.
          बाराव्या शतकात म्हणजे हजारो वर्षांपूर्वी लोकशाही मूल्ये जपणाऱ्या निधर्मी समाज रचनेचा आरंभ 'अनुभव मंडपाच्या " रूपाने करून महात्मा बसवेश्वरांनी जगासमोर सर्वप्रथम एक आदर्श ठेवला.म्हणूनच ते जगातील " पहिले महात्मा " ठरले. मंगळवेढा प्रांतातील बिज्जळ राज्याचे प्रधानमंत्री झाल्यानंतर अनुभव मंटप या नावाने लोकशाही संकल्पनेचा शुभारंभ त्यांनी केला.सर्व धर्मियांना एकत्र करून निधर्मी तत्त्वज्ञानाची बीजे त्यांनी रोवली.जातीभेद नष्ट करण्याची समाजरचना मांडली,त्याच तत्वानुसार आज लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.
            अशा युगप्रवर्तकांचा वैचारिक ठेवा भविष्यात सदैव स्मरणात राहण्यासाठी दिल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाला अनुभव मंटप अथवा बसवमंटप असे नामकरण झाले पाहिजे.यासाठी कर्नाटकातून खूप मोठ्या प्रमाणात उठाव सुरू झाला आहे.त्याची सुरूवात बसव तत्व प्रसारक धर्मगुरूंनी केली आहे.महाराष्ट्र,आंध्र, तेलंगणा,गोवा राज्यात खूप मोठ्या प्रमाणात वीरशैवांतील अठरापगड समाज बांधवासह लिंगायत आणि बसवप्रेमींकडून याबाबत पाठपुरावा होणे ही काळाची गरज आहे.      
              त्यासाठी समाजातील बसवप्रेमीं संघटनांनी आपली निवेदने पंतप्रधान कार्यालयास पाठवावीत.सर्व पक्षीय खासदार,आमदार,सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि  पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहाराची मोहीम गतीमान करावी. असे आवाहन परळी समाचार चे संपादक तथा बीड जिल्हा लिगांयत संघर्ष समितीचे समन्वयक आत्मलिंग शेटे  यांनी केले आहे.

चोरट्यांनी घरात शिरून पाच तोळे सोने व एक लाख रोख रक्कम घेऊन केला पोबारा.


*याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु केला आहे. 

दिंद्रुड (प्रतिनिधी) : कांदेवाडी परिसरात चोरट्यांनी एका घरात शिरून पाच तोळे सोने व एक लाख रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु केला आहे. 

धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथील वैजनाथ आश्रुबा कांदे रविवारी रात्री जेवण करून घरी झोपले होते. सकाळी घराबाहेरील माळरानावर तीन रिकाम्या पेट्या, कागदपत्रे, साड्या आणि काही सामान अस्ताव्यस्त पडलेले कांदे यांच्या निदर्शनास आले. विखुरलेले सामान घरातील असल्याचे कांदे यांच्या लक्षात आले. त्यानंतर कांदे यांनी दिंद्रुड पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळावर भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेळी विक्री आणि शेतमालातून आलेली जवळपास एक लाख रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचे कांदे यांच्या निदर्शनास आले आहे.


तत्कालीन आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर उतरले रस्त्यावर; पुनर्नियुक्तीची केली मागणी.



*मोर्चात विविध सामाजिक संघटना सर्वपक्षीय नेते यांचा सहभाग होता. प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे.

बीड (कांतीकारी साथी न्युज) तत्कालीन आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर रस्त्यावर उतरले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागीय आयुक्तपदी पुनर्नियुक्ती करा या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. तुकाराम मुंढे बदली विरोधी कृती समितीच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मोर्चात विविध सामाजिक संघटना सर्वपक्षीय नेते यांचा सहभाग होता. प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. मात्र सातत्याने त्यांची बदली केली जात असल्याने बीडकरांनी संताप व्यक्त केला. यापूर्वी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या समर्थनात बीड जिल्हावासीय रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांचं समर्थन करीत समस्त बीडकर रस्त्यावर उतरत त्यांच्या पुनर्नियुक्तीची मागणी केली आहे.