अंबाजोगाई (प्रतिनिधी) बावीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी सकाळी चिचखंडी शिवारात उघडकीस आली.
अर्जुन पंढरी गडदे वय 22 वर्ष, रा.चीचखंडी असं मृत तरुणाचं नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी चीचखंडी शिवारात रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला.अर्जुनच्या शरीरावरील घाव पाहता दगडाने चेहर्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला.तरुणाच्या खुणाचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.
SHARE
No comments:
Post a Comment