केज (प्रतिनिधी) केज तालुक्यातील भाटुंबा येथील सरपंच व ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उपोषणाला आज पाचवा दिवस सुरू आहे. उपोषणार्थींच्या प्रश्नावर चौकशी समिती नेमली आहे परंतु त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच आपण उपोषण सोडणार आहेत. तोपर्यंत वैद्यकीय तपासणी किंवा उपचार आम्ही करून घेणार नाहीत, तसेच उपोषण स्थळही सोडणार नाहीत अशी भूमिका सरपंच सुनिल धपाटे आणि माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे यांनी घेतली आहे परंतु काही उपोषणार्थींची प्रकृती खालावली असल्याने उपजिल्हारुग्णालयातील डॉक्टरांचा ताफा तहसील कार्यालयासमोर उपोषणस्थळी दाखल झाला असून डॉ.विशाल करपे आणि त्यांच्या टिमने अवश्यक ती तपासणी करून सलाईन चालू केले आहेत.
तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आता दवाखान्याचे स्वरूप आले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच उपोषण सोडले जाईल असे माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे आणि सरपंच सुनिल धपाटे सांगत आहेत यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ सुरू झाली असल्याचे आज पहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment