बीड (कांतीकारी साथी न्युज) मराठवाड्यातील मराठा समाज हा पुर्वाश्रमीचा कुणबीच आहे तशी त्याची शासन दरबारी नोंदही आहे.तेव्हा आम्हाला मराठा कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासाठी युवकांनी लढा उभा करावा असे आवाहन माजी कुलगुरू न्या.गायकवाड आयोगाचे तज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांनी बीड येथील मराठा आरक्षण चिंतन बैठकीत केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ. राजेंद्र जगताप हे होते.
ते पुढे म्हणाले की सन १८८१ रझाकाराच्या राज्यात व सन १९३१ घ्या झालेल्या जनगणनेत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी यांची लोकसंख्या तीस ते पस्तीस टक्के दाखवलेले शासनाकडे रेकाॅर्ड आहे. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त टक्केवारी आहे. पुर्वीचे कुणबी हेच आजचे मराठा आहेत.तेव्हा यापुढे लाखोंचे मोर्चे काढुन समाजाने आपला पैसा वेळ वाया न घालवता कायदेशीर मार्गाने मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी लढा उभा करावा लागेल. तसेच मराठा समाजाने नव्याने लागु झालेल्या दहा टक्के ई डब्ल्यु एस आरक्षणाचा ही लाभ घ्यावा.या आरक्षणाच्या निकषात मोठ्या प्रमाणात मराठा समाज बसतो.याचा फायदा आपण शिक्षणात आणि नौकर्यात घेतला पाहिजे.
या बैठकिला मराठा विचार मंचाचे अशोक हिंगे सुनील सुरवसे प्रा.दिनकर तेलप कॅड. प्रीतम जगताप विठ्ठल बहीर नितीन धांडे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशेक ठाकरे ॲड. राज पाटील ॲड.महेश धांडे सुदर्शन धांडे प्रा. शिवाजी खांडे सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
बैठकीचे आयोजन महादेवराव धांडे यांनी केले होते.
No comments:
Post a Comment