Saturday, November 19, 2022

च-हाटा येथे ट्रान्सफार्मर बसवा अन्यथा रस्ता रोको - युनूस शेख


 बीड (प्रतिनिधी) प्राथमिक आरोग्य केंद्र च-हाटा येथे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावा तसेच कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडुन सक्तीची विजबिल वसुली निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड जिल्हाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२० नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी ११ वा. च-हाटा बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन इशारा 
 चहाटा प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी ट्रान्सफार्मर बसविण्यात आला नसल्यामुळे विदयुत पुरवठा नाही तसेच कृषिपंप वीज कनेक्शन तोडुन रबी हंगामातील ज्वारी, हरबरा, गहु आदि पिकांचा पेरा झाला असुन त्यांना पाण्याची आवश्यकता असुन वीज खंडित केल्यामुळे पिके वाया जाण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची दाट शक्यता आहे. तसेच घरगुती विजवाहकांना मिटर रिडींग न घेताच वाढीव विजबील दिल्यामुळे तीव्र नाराजी असून संबंधित प्रकरणात आवश्यक उपाययोजना करण्यात यावी तसेच शेतक-यांना कृषिपंपाचे वीजबिल भरण्यास सवलत देण्यात यावी. वरील मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड जिल्हाध्यक्ष शेख युनुस च हाटकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२० नोव्बर २०२२ वार रविवार रोजी सकाळी ११ वाजता च-हाटा बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याची गंभीर नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment