Thursday, November 10, 2022

खळबळजनक ! प्रेमप्रकरणातून औंधमध्ये उच्चशिक्षित तरुणीचा चाकूने भोसकून खून.



पुणे (प्रतिनिधी)  प्रेमप्रकरणातून एका महाविद्यालयीन तरुणीचा भरदिवसा चाकूने सपासप वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना औंध परिसरात बुधवारी (ता. ०९) दुपारी घडली आहे. 
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पुण्यात नेमके चालले आहे काय अशी उद्विग्न सवाल नागरिक विचारात आहेत. श्वेता रानवडे (वय-२२ रा. औंध, पुणे) असे खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून चतु:शृंगी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेताचे नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघेजण लग्न करणार होते परंतु तरुणाची वर्तणुक योग्य नसल्याने तिने त्याच्यासोबत असलेले संबंध तोडले होते. त्यामुळे आरोपी तरुण तिच्यावर चिडला होता. बुधवारी दुपारी श्वेता औंध जकात नाका परिसरातून घरी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला आडवले. दरम्यान, आरोपी तरुणाने सोबत आणलेल्या चाकूने श्वेताच्या गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे आणि तपास पथकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment