बीड (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक २०२२साठी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत वंचित बहुजन परिवर्तन पॅनल सिनेटच्या निवडणुका लढवत असून त्यासाठी उद्या दि.१७ रोजी विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या संपर्क कार्यालयावरती दुपारी ठीक 12 वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभाग प्रमुख अशोक हिंगे पाटील उपस्थित राहणार आहेत.तर सम्यक विद्यार्थी आंदोलन चे नेते तथा पॅनल प्रमुख प्रा.प्रकाश इंगळे यांचे सह आधी सभा निवडणुकीचे सर्व उमेदवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व जिल्हा/तालुका/शहर पदाधिकारी तालुकाध्यक्ष महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी बैठकिला वेळेवर उपस्थित रहावे,निमंत्रक, वंचितचे नेते संतोष जोगदंड,पुरुषोत्तम वीर, मेजर अनुरथ वीर. यांनी कळवले आहे.
No comments:
Post a Comment