Monday, November 21, 2022
गुरुकृपा नगर गीताई महिला भजनी मंडळाच्या वतीने ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथील गुरूकृपा नगर मध्ये गिताई महिला भजनी मंडळाच्या वतीने भव्य सत्कार ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांना राज्यस्तरीय वारकरी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल परळी येथील गुरुकृपा नगर गीताई महिला भजनी मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी ह.भ.प.कोकाटे महाजांच्या कार्याचे आनेक महिलांनी कौतुक व महिलांन साठी भजनी मंडळाच्या गल्लोगल्ली शाखा स्थापन करून मोठे कार्य कोकाटे महाराज यांनी केले. या सर्व महिलांना भजनी मंडळात घेऊन एक मोठे व्यासपीठ निर्माण केले हे काही लहान गोष्ट नाही महिलांचे संघटन करण हे कार्य करणे सोपे नाही आसे ह.भ.प.जगदिश महाराज सोनवने यांनी बोलतांना म्हणाले तर सत्कार प्रसंगी आनेक महिलांनी कोकाटे महाराज यांच्या कार्याबद्दल कौतुक केले तर सत्कार करतांना महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा उषाताई हरेगावकर, कल्पनाताई लांडे,लताताई येळाई, सरस्वतीताई पतंगे, सरस्वतीताई हरेगावकर, निर्मलाताई डहाळे, सुमनताई खेडकर, प्रेमालाताई उदावंत, कल्पनाताई सोनी, सौ कल्पनाताई सोळंके, कमलताई लड्डा, उषाताई देशमुख, मंगलताई कुलकर्णी, कृष्णाताई जाधव, मीनाताई शिंदे, शामाताई वळसे, संगीताताई डाहाळे, कुसुमताई हरेगावकर, शकुंतलाताई टेकाळे, चित्राताई भाकरे, शांताबाई, अलकाताई रंगनाथ सुरनर धुळगंडे यांच्या हस्ते ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या लेखिका अलकाताई सुरनरताई यांचे कोकाटे महाराज यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आलकाताई यांनी कविता संग्रह पुस्तक लिखान केल्याबद्दल त्यांचेही या वेळी कोकाटे महाराज यांनी कौतुक केले व त्यांनाही या वेळी शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment