ही धक्कादायक घटना कर्मवीर नगरात घडली, त्याठिकाणी शेख कुटुंबात विवाह सोहळा सुरू होता.
स्वागत समारंभात डीजे लावण्यावरून वाद झाला. काही वेळाने सात ते आठ तरुण कार्यक्रमस्थळी आले. त्यांनी शेख मोईन शेख इक्बाल सोबत वाद घातला. डीजे बंद का केला? डीजे लाव असं म्हणत तरुणांनी इक्बालसोबत वाद घातला. त्यांनी इक्बालवर चाकूनं सपासप वार करण्यास सुरुवात केली. छातीत चाकू खुपसल्याने त्याचा मृत्यू झाला. Nanded crime
या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काही आरोपींना अटकदेखील झाली आहे. मात्र गुन्ह्यातील खऱ्या आरोपींना अटक करा या मागणीसाठी नातेवाईकांनी मयताचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. त्यामुळे काहीकाळ पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला.
No comments:
Post a Comment