*13 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण.
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) जनकल्याण सामाजिक सेवा संस्था दिंडनेर्ली ता.करवीर जि.कोल्हापुर च्या वतिने देण्यात येणारा वारकरी भुषण हा राज्यस्तरीय पुरस्कार अ.भा.वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांना जाहीर झाला असुन या पुरस्काराचे वितरण दि.13 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जनकल्याण सामाजिक सेवा संस्था दिंडनेर्लीचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह प.पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली असुन 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा पुरस्कार देण्यात येत आहे.ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी अ.भा.वारकरी मंडळाच्या माध्यमामातुन शेकडो शाखा स्थापन करण्याबरोबरच वारकरी संप्रदायात मोलाचे कार्य केलेले आहे. समाजाच्या कल्याणासाठी करीत असलेले लक्षणीय काम याची दखल घेऊन या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवार १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा. माऊली संकुल सभागृह, अहमदनगर येथे संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत तसेच सामाजिक चळवळीतील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.रामेश्वर महाराज कोकाटे यांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.राज्यस्तरीय वारकरी भुषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment