Tuesday, November 8, 2022

श्री गुरुराज माऊली, मन्मथ माऊलीचा जयघोष करीत श्री संत मन्मथ स्वामींचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

बीड (प्रतिनिधी) श्री गुरुराज माऊली, मन्मथ माऊलीचा जयघोष  करत महाराष्ट्र तेलंगणा , आंध्रप्रदेशातील पदयात्रा, दिंड्या   क्षेत्र कपिलधार येथे आल्या. अहमदपूरकर महाराज, बर्दापुरकर महाराज अंबाजोगाईकर महाराज, कळमनुरीकर महाराज यांच्यासह अनेक ठिकाणचे शिवाचार्य व लिंगायत समाजातील कार्यकर्ते व  हजारो शिवभक्तांनी श्री संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे लाखो भाविकांनी आज सोमवारी दर्शन घेतले.
आज सोमवार दि.7 नोव्हेंबर रोजी कपीलधार येथील श्रीसंत मन्मथस्वामींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लागलेल्या होत्या
 .दुपारी 4.10 वाजता संत शिरोमनी मन्मथ स्वामी यात्रेनिमित्त सोमवारी बीड जिल्हाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या समाधी स्थळी  शासकीय महापूजा ,आरती करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईचे श्री शंभूलिंग शिवाचार्य महाराज ,शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे, अक्षय मुंदडा, युवक नेते योगेश क्षीरसागर ,राजेंद्र मस्के,श्री क्षेत्र कपिलधार मंदिर ट्रस्ट श्री बाबासाहेब कोरे ,विजयकुमार कोरे, भाजपाचे परळी  शहर उपाध्यक्ष महादेव  इटके, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश चौंडे, विकास हालगे,युवक नेते अश्विन मोगरकर ,नितीन समशेट्टे, पत्रकार संजय खाकरे, बंडू चौंडे, प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे, आदर्श शिक्षक अशोक नावंदे, उपस्थित होते. संत मन्मथ स्वामी देवस्थान च्या वतीने पालकमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांचे यांचे स्वागत पंचकमिटी चे विश्वस्त श्री सोमनाथअप्पा हालगे यांच्या हस्ते  करण्यात आले यावेळी बाबासाहेब कोरे, शिवशंकर भुरे,शांतीविर चौधरी,श्रीकांत मिटकरी,विजयकुमार कोरे,अशोक शहागडकर,विष्णुपंत वाघमारे, पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष वसंत मुंडे वैभव स्वामी उपस्थित होते व सामाजिक कार्यकर्ते संजय घाळे उपस्थित होते,

No comments:

Post a Comment