बीड (प्रतिनिधी) :- राज्याचे कृषीमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या तसेच लोकसभेच्या खासदार संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल गालीच्छ वक्तव्य केले आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हनन करते. या वक्तव्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तारांचा आम्ही जाहिर निषेध करतो अशी प्रतिक्रिया आ.संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. मंगळवार (दि.८) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment