Wednesday, November 23, 2022

महापुरुषांचा अपमान करणे हीच भाजपची शिकवण का ? - भूषण सरदार

अमरावती (प्रतिनिधी) : राज्याचे राज्यपाल कोशारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले तसेच या अगोदर सुद्धा त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले – सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचे विधान केले होते. तसेच भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे विधान केले आहे. राज्याचे राज्यपाल एक जबाबदार व्यक्ती असे विधान करतात ही अतिशय निंदनीय बाब आहे. महापुरुषांबद्दल माहिती नसेल तर अगोदर त्यांनी अभ्यास करावा . आपल्या पदाचा राजीनामा देऊन जनतेची माफी मागावी अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात राज्यपालांचा व भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध करू .
भाजपची हीच शिकवण आहे का ? महापुरुषांचा अपमान करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे हे भाजपने जनतेला सांगावे . अन्यथा भाजप सरकारने सुधांशू त्रिवेदी व राज्यपाल कोशारी यांचा राजीनामा घेऊन त्यांना महापुरुषांचा अभ्यास करण्यासाठी घरी बसवावे.

No comments:

Post a Comment