Tuesday, November 1, 2022

स्फोटकासारखा मोठ्या भूगर्भातील गुढ आवाजाने बीड हादरले !


बीड (प्रतिनिधी) स्फोटकासारखा मोठा आवाज भूगर्भातून येताच काही क्षण जमीन हादरल्याचा भास निर्माण झाला. ही घटना आज दुपारी 12: 43 च्या दरम्यान घडली. हा आवाज जवळपास पूर्ण बीड तालुक्यात जाणवला.

आज दुपारी 12: 43 च्या दरम्यान भूगर्भातून प्रचंड मोठा आवाज झाल्याने जमीन हादरली.सोबतच कच्च्या घरातील रॅक वरील भांडी देखील पडली असल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे. हा आवाज इतका मोठा होता की जवळपास पाच ते सात मिनिटं आकाशातून विमान उडताना जसा आवाज होतो त्याच पद्धतीने आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. नेमका हा आवाज कुठून व कसा आला याची अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिली नाही.

No comments:

Post a Comment