परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा आयोजित भव्य धम्म मेळाव्याच्या प्रचार व प्रसारासाठी आज सकाळी ठीक दहा वाजता भिमनगर येथून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या मोटार सायकल रॅलीत भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सकाळी ठीक नऊ वाजता भिमनगर येथे मोटर सायकल घेऊन हजर राहावे येथूनच परळी शहरातील प्रत्येक दलित वस्तीत व बुद्ध विहारात जाऊन नांदेड येथील भारतीय बौद्ध महासभा आयोजित भव्य धम्म मेळाव्यास एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार असून परळी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी जावे यासाठी सदरील रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा सचिव एडवोकेट संजय रोडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रोडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाऊ साळवे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव विष्णुपंत मुंडे तालुका कोषाध्यक्ष राजू भुतके वंचित बहुजन व आघाडीचे तालुका महासचिव ज्ञानेश्वर गीते वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार शा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर वंचित बहुजन व आघाडीचे शहर महासचिव विनोद रोडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment